नॉर्थ महाराष्ट्र बिसनेस सेंटर दिल्ली यांच्या धुळे येथील कार्यालयाकडुन राबविण्यात येणाऱ्या “आत्मनिर्भर महाराष्ट्र” या शुन्य रुपये गुंतवणुकीच्या योजने अंतर्गत नाशिक विभागाकरीता खालील पद्धतीने नेमणुका करण्यात येणार आहेत: १) प्रत्येक (नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार) जिल्ह्याकरीता एक मुख्य समन्वयक बचत गट/संस्था व आवश्यक असल्यास प्रति तालुका एक समन्वयक बचत गट/संस्था, २) प्रति तालुका एक तालुका व्यवस्थापक व तालुक्यातील गावांच्या एकुण संख्येच्या 25%-30% एवढ्या महिला उद्योजिका निर्मिती, (उदा. गावांची संख्या 100 तर महिला उद्योजिका 25-30) ३) सदर पदांची नेमणुक ही 11 महिन्याच्या करार स्वरुपाची असेल,
★ योजनेबद्दल थोडेसे : ● योजनेचे उद्दिष्ट: ग्रामिण व शहरी भागातील मुली व महिलांना त्यांच्या गावात किंवा परिसरात शुन्य रुपये गुंतवणुकीत रोजगार उपलब्ध करुण देणे. ● योजनेत कोण सहभागी होवु शकणार: महिला किंवा मुलगी ज्या एखाद्या खाजगी किंवा शासकीय बचत गटातील सदस्या आहेत, खाजगी संस्थेच्या सदस्या, अपंगगगवक्सग्जक्सफ महिला, विधवा महिला (जर आपण बचत गट किंवा संस्थेचे सदस्य नसणार तर आमच्याकडून तुम्हाला सहकार्य करणा-या संस्थेचे सदस्य होण्यासाठी सहकार्य केले जाईल) ● रोजगाराचे मासिक उत्पन्न: रुपये 4000-15000/- ● उत्कृष्ट काम करणा-या संस्थेस/गटास वर्षाखेर सी.एस.आर. फंड/ सहायता निधी मिळवण्याची संधी ● मोफत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम रावविल्यास वेगळे मानधन
★ पात्रता : ◆ बचत गट/संस्थेसाठी अटी व शर्ती: १) बचत गट /संस्था नोंदणीकृत असावा /असावी, २) संस्था असल्यास निती आयोगात नोंदणी असावी. ३) बचत गटाचे/संस्थेचे बॅंकेत खाते असावे. ४) जर ऑडीट झाले असेल तर ऑडीट रिपोर्ट तपासणी वेळी सादर करावा. ५) संस्था असल्यास आपत्ती व्यवस्थापन हा विषय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील असावा.
★ अर्ज करण्याची पद्धत :
◆ बचत गट/ संस्था: १) जाहिरातीत दिलेल्या वेळेत अर्ज भरुन विभागीय समन्वय संस्थेकडे सादर करावा. २) अर्जासोबत वर नमुद सर्व कागदपत्रांची पुर्तता करावी अंदाजित तालुका समन्वयकांची यादी जोडावी. ३) ज्या गावांमध्ये/शहरांमध्ये कार्यक्रम राबवायचा आहे, त्यांची अंदाजित यादी जोडावी.
◆ व्यक्तीगत अर्ज: १) अर्ज २) सर्व शैक्षणिक व अनुभवाचे कागदपत्र ३) पालकांकडुन ना-हरकत दाखला ४) कोणत्याही प्रकारच्या पोलिस प्रकरणात नाहीत या बद्दल लेखी ५) शिक्षण घेत असल्यास त्याबबतचा दाखला (स्वत: च्या स्वाक्षरीने)