Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
धुळे : युवकांनी युवकांच्या वतीने समाज कार्यासाठी सुरू केलेल्या के.वाय.के.एम फाऊंडेशन या संस्थेला वर्षपूर्ती होत आहे. यानिमित्ताने प्रथम वर्धापनदिन साजरा करण्यासाठी "वार्षिक सभासदत्व प्रदान आणि अहवाल अवलोकन" कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. हेमंत जोशी उपस्थित होते, त्यांनी के.वाय.के.एम हे युवकांनी घडवलेल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे संच असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करतांना संस्थेचे सचिव कल्पेश बोरसे यांनी २०२१-२०२२ या वर्षात संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला, यात औरंगाबाद येथे शिवजयंती निमित्ताने प्रश्नमंजुषा, शब्दरंग करंडक वक्तृत्व स्पर्धा-२०२१, लसीकरण मोहीम अंतर्गत १२०० लोकांचं लसीकरण, शिक्षक दिनानिमित्त शालेय वस्तू वाटप, शिरपूर येथील वस्तीत खाद्यपदार्थ वाटप, नवरात्रीनिमित्ताने अवधान येथील आदिवासी पाड्यावर प्रकल्प "सक्षम" अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सॅनिटरी पॅड वाटप उपक्रम सुरू, औरंगाबाद येथे निबंध स्पर्धा, कोजागिरी पौर्णिमेला रस्त्यावरील गरिबांना अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते दूध वाटप, वृद्धाश्रमात प्रकल्प आनंद चे उद्घाटन, दीपावली पाडवा निमित्ताने "एक दिवा शहिदांसाठी" कार्यक्रम, एस.टी.कर्मचारी यांच्या मनोरंजनाकरिता जादूचे प्रयोग, प्रकल्प आधार अंतर्गत आदिवासी वस्तीत कपडे वाटप, कोरोना जनजागृती अभियान अंतर्गत मास्क, साबण, सॅनिटायझर वाटप, गरिबांचा सांता उपक्रमा अंतर्गत रस्त्यावरील गोरगरिबांना ब्लॅंकेट आणि चादर वाटप, असे अनेक उपक्रम वर्षभरात राबविण्यात आल्याची माहिती दिली.त्यानंतर २०१८ ते २०२२ पर्यंत के.वाय.के.एम फाऊंडेशनची वाटचाल धुळे ते महाराष्ट्र राज्य कशी झाली आणि त्यामुळे समाजात काय बदल काय झाला यावर संस्थेचे सहसचिव चेतन उपाध्याय यांनी मत व्यक्त केले. या वर्धापनदिनी दिव्या सावळे, ज्ञानेश्वरी बिडवे, कल्याणी मोरे, स्नेहा बडगुजर, प्रियंका विसपुते, राखी बडगुजर, हर्षदा बडगुजर, मानसी शिसोदे, अश्वघोष पवार यांना सभासदत्व प्रदान केले गेले. त्यानंतर त्यांना "प्रकल्प समन्वयक" पदाचा कार्यभार देण्यात आला. तसेच नव्याने स्वयंसेवक झालेल्या सदस्यांना ओळखपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक समिती सदस्य निलेश तेलंग, स्वयंसेवक साक्षी जाधव, भाग्यश्री भावसार, हर्षदा जाधव, संजना सरख, दिव्या गवळी, गौतमी कुलकर्णी, प्रसाद महाले, लवेश मोरे, भाग्येश मोरे उपस्थित होते. या वर्धापनदिन निमित्ताने श्री.गणेश शेजुळ यांच्या परिवारातर्फे स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
0 Comments
|
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |