Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
धुळे : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या औचित्याने के.वाय.के.एम फाऊंडेशनचे धुळे जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या वतीने जिल्ह्यातील खान्देश गोशाळा येथे गौमातेला चारा वाटप करण्यात आला. येत्या काळात या गोशाळेत संस्थेच्या तर्फे वस्तू भेट देण्यात येणार आहेत तसेच तेथे सफाई करून परिसर स्वच्छ करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी के.वाय.के.एम फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे सहसचिव चेतन उपाध्याय, जिल्हाध्यक्ष प्रसाद कन्हैयालाल महाले आदी उपस्थित होते.
धुळे : के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्याचा पुढाकार घेण्यात येतो त्यातील "प्रकल्प सक्षम" या अंतर्गत स्त्रियांविषयक उपक्रम आणि समुपदेशन करण्यात येत असते. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील अवधान परिसरात कोरोना महामारीच्या नियमांचे उल्लंघन न करता प्रकल्प सक्षम द्वारे के.वाय.के.एम च्या युवती स्वयंसेवकांनी प्रत्येक घरोघरी जाऊन समुपदेशन केले. यात महिलांच्या समस्या जाणून घेतल्या, आणि त्यांना स्त्रीविषयक कोणत्या गरजू वस्तू मिळत नाही याची पूर्ण माहिती संकलित करण्यात आली. लवकरच संस्थेच्या वतीने या सर्व स्त्रियांना स्त्री विषयक गरजू वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. हे समुपदेशन दिव्या साळवे व रिना पाटील या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे पूर्ण केले.
"मोफत (Covaxin) करोना लसीकरण अभियान" मोहिमेअंतर्गत लसीकरण पूर्ण करणार..! धुळे: करोना महामारीला आळा घालण्यासाठी आणि तिसऱ्या लाटेपासून नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या वतीने धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव रोड परिसरात सर्व्हे करण्यात आला. दिनांक ३ ऑगस्ट रोजी डॉ.मिरजकर नगर, पंचवटी नगर आणि पश्चिम हुडको या परिसरात हा सर्व्हे झाला, त्यात २५० घरातील १३० नागरिकांचे लसीकरण बाकी असल्याचे निदर्शनास आले. तसेच दिनांक ०४ ऑगस्ट रोजी पवन नगर, चाळीसगाव रोड या परिसरात हा सर्व्हे करण्यात आला, येथे १५० घरातील १०६ नागरिक लसीकरण बाकी असल्याचे निदर्शनास आले. हा सर्व्हे स्वतः के.वाय.के.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय आणि संस्थापक सदस्य मुकेश फलके ह्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला आणि त्यात महत्वाची बाब म्हणजे या सर्व नागरिकांची प्रथम लस बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या सर्व्हेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रथम लस बाकी असणाऱ्या नागरिकांना के.वाय.के.एम फाऊंडेशन आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "मोफत (Covaxin) करोना लसीकरण अभियान" याअंतर्गत खान्देश कॅन्सर सेंटर हॉस्पिटल,धुळे या ठिकाणी दिनांक ५,६,७ ऑगस्ट रोजी लसीकरण करण्यात येणार आहे. आवाहन के.वाय.के.एम फाऊंडेशन आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्यातील नागरिकांचे झपाट्याने लसीकरण करण्यासाठी "मोफत (Covaxin) करोना लसीकरण अभियान' आयोजित करण्यात आले आहे. दिनांक ०५, ०६, ०७ ऑगस्ट रोजी खान्देश कॅन्सर सेंटर, सुरत बायपास रोड, नवीन सिव्हिल हॉस्पिटलजवळ, धुळे या ठिकाणी हे अभियान आयोजित करण्यात आले आहे. ज्या नागरिकांची प्रथम किंवा द्वितीय लस घेण्याची बाकी असेल त्यांनी लसीकरण करण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक सोबत घेऊन लसीकरणाच्या ठिकाणी उपस्थित रहावे. आपली नोंदणी करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असून आपणास PPE किट देखील उपलब्ध करून दिली आहे. कृपया फक्त COVAXIN या लसीचा प्रथम आणि द्वितीय डोस उपलब्ध आहे याची नोंद घ्यावी. धुळे : करोना महामारीला आळा घालण्यासाठी आणि तिसऱ्या लाटेपासून नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी के.वाय.के.एम फाऊंडेशन आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "मोफत (Covaxin) करोना लसीकरण अभियान" प्रथम टप्पा ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान यशस्वी संपन्न झाला. २८ जुलै रोजी प्रायोगिक तत्वावर या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
या अभियानासाठी के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या वतीने धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव रोड परिसरात सर्व्हे करण्यात आला. दिनांक ३ ऑगस्ट रोजी डॉ.मिरजकर नगर, पंचवटी नगर आणि पश्चिम हुडको या परिसरात हा सर्व्हे झाला, त्यात २५० घरातील १३० नागरिकांचे लसीकरण बाकी असल्याचे निदर्शनास आले. तसेच दिनांक ०४ ऑगस्ट रोजी पवन नगर, चाळीसगाव रोड या परिसरात हा सर्व्हे करण्यात आला, येथे १५० घरातील १०६ नागरिक लसीकरण बाकी असल्याचे निदर्शनास आले. हा सर्व्हे स्वतः के.वाय.के.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय आणि संस्थापक सदस्य मुकेश फलके ह्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला आणि त्यात महत्वाची बाब म्हणजे या सर्व नागरिकांची प्रथम लस बाकी असल्याचे स्पष्ट झाले. लसीकरण बाकी असलेल्या सर्व नागरिकांचे खान्देश कॅन्सर सेंटर हॉस्पिटल,धुळे या ठिकाणी दिनांक ५,६,७ ऑगस्ट रोजी लसीकरण करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील रानमळा, मोहाडी, वाडीभोकर रोड, मिल परिसर, कॉटन मार्केट, इत्यादी दुरवरील ठिकाणच्या लोकांनी लसीकरण पूर्ण करण्यासाठी स्वइच्छा दाखवली. या सर्वांना द्वितीय डोस देखील या उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच अभियानाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येईल.ज्यात प्रथम लस बाकी असलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात येईल. हे अभियान यशस्वी करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनचे राज्य समन्वयक श्री.दिपक केकन आणि व्यवस्थापक श्री. शुभम लाखकर, के.वाय.के.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, संस्थापक सदस्य मुकेश फलके आणि जागृती मोगरे यांनी परिश्रम घेतले. |
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |