Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
धुळे : के.वाय.के.एम फाऊंडेशन, महाराष्ट्र तर्फे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अरुणावती नदी काठी वसलेल्या खर्दे बु. या गावातील शनी मंदिर परिसरात असणाऱ्या पाड्यावरील लहान मुलांची आरोग्य तपासणी आणि शैक्षणिक पाहणी करण्यासाठी दिनांक २८ रोजी के.वाय.के.एम चे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय यांनी दौरा केला. यावेळी तेथील मुलांना बिस्कीटे वाटप करण्यात आली, खेळ आणि जादूचे प्रयोग दाखवून मनोरंजन करण्यात आले. तसेच संस्थेचे शिरपूर तालुक्यातील पदाधिकारी यांची आढावा बैठक घेऊन येत्या काळात या वस्तीत काय सुधारणा करण्यात येतील यावर चर्चा झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, शिरपूर तालुकाध्यक्ष गणेश चौधरी, तालुका सचिव हर्षदा सैंदाणे, स्वयंसेवीका प्रियंका कोळी उपस्थित होते. धुळे : के.वाय.के.एम फाऊंडेशच्या प्रकल्प "शिक्षा" अंतर्गत अवधान गावात लहान मुलांना रोज शिक्षणाचे धडे शिकवले जातात, मात्र शिक्षक दिनाच्या निमित्ताने स्वयंसेविका दिव्या सावळे व रीना पाटील यांनी गावातील विद्यार्थ्यांना कोरोना काळात दुरावलेल्या शिक्षक आणि शाळा यांचं महत्त्व पटवून देण्यासाठी रोज जे मुलं-मुली विद्यार्थी म्हणून दैनंदिन तासिका शिकण्यासाठी येत असतात, त्यांच्यातील एका चिमुकल्या कु.साक्षी ज्ञानेश्वर पाटील या मुलीला शिक्षक बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले, आणि या मुलींने अगदी नियमितपणे जसं शिक्षक शिकवतात तश्याच रीतीने अगदी शिस्तबद्ध पध्दतीने विद्यार्थ्यांना आज शिकवलं. या विद्यार्थ्यांना के.वाय.के.एम कडून नियमितपणे शिक्षण आणि शिक्षणविषयक वस्तू दिल्या जाणार आहेत.
के.वाय.के.एम फाऊंडेशनतर्फे प्रकल्प "शिक्षा" अंतर्गत कार्यरत शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या पूर्वसं5/9/2021
धुळे : के.वाय.के.एम फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या धुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांतर्फे संस्कार कंप्यूटर्स येथील संचालक वर्षा बनछोड मॅडम,अभिजीत बनछोड सर तसेच स्टाफ मेंबर्स ज्ञानेश्वर खैरनार, यशश्री चौधरी, गायत्री पवार ह्या शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या पुर्वसंध्येला सत्कार करण्यात आला. कोरोना महामारी काळात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील शिक्षकांनी ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिल्याबद्दल त्यांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले, यावेळी के.वाय.के.एम फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे सहसचिव चेतन उपाध्याय, जिल्हाध्यक्ष प्रसाद कन्हैयालाल महाले आदी उपस्थित होते.
|
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |