Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
अखिल भारतीय नाट्य परिषद व के.वाय.के.एम संस्थेचा वतीने मराठी रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात नाट्य परिषदेचे वतीने श्री चंद्रशेखर पाटील , डॉक्टर अभिनव दरवडे , श्री भटू चौधरी , श्री पारिजात चव्हाण , श्री प्रदीप गोपाळ , श्री राजू भावसार , श्री सचिन बागुल, के. वाय.के. एम महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री मोहनिष वाडेकर, सचिव श्री कल्पेश बोरसे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी रंगभूमी पूजन करण्यात आले त्यानंतर कलेचे दैवत श्री नटराज यांचे पूजन करण्यात आले . यावेळी तंगा मंगा ना दंगा या व्यावसायिक नाटका बद्दल बोलताना भटू चौधरी यांनी सांगितले की भारतात कदाचित पहिल अस हे नाटक आहे की कोरोना आणि लोकडाऊन मुळे या नाटकाची तालीम गेली 6 महिने गुगल मिट या अँप वर दररोज 3 तास होत असते खानदेशातील प्रसिद्ध इतिहासकार , तथा साहित्यिक श्री बापूसाहेब हटकर यांच्या लेखणीतून हे नाटक साकार झाले असून श्री मनोहर खैरनार हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत . जलरंग तापी संस्था ची ही निर्मिती आहे. खानदेशातील विविध गावातील कलाकार यात निवडण्यात आले असून गेली 6 महिने अविरत तालीम चालू आहे लवकरच हे नाटक रंगभूमीवर येईल असे देखील भटू चौधरी यांनी सांगितले . श्री चंद्रशेखर पाटील यांनी देखील सर्व कलाकार यांना संघटित होऊन कार्य करण्याचा मौलिक सल्ला दिला तसेच कलाकारांना माफक दरात सरावासाठी नाट्य मंदिर मिळवून देऊ असे आश्वासन दिले, श्री अभिनव दरवडे यांनी देखील नाटक व त्यात येणाऱ्या अडचणी याबाबत सविस्तर समयोचित मार्गदर्शन केले.खान्देशातील कलाकारांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी अथक परिश्रम याविषयी इतर मार्ग नाही असे सूतोवाचन अभिनेते प्रदीप गोपाळ यांनी केले, तसेच त्यांच्या वतीने खान्देशातून कलाकारांना मदतीचा हात देऊन पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले, या कार्यक्रमात तंगा मंगा ना दंगा या नाटकातील कलाकार श्री भटू चौधरी श्री कुणाल शिंदे श्री ध्यानेशवर शिंदे श्री भारत पवार व श्री अभिनव दरवडे श्री जादुगार चेतन उपाध्याय व दिग्दर्शक श्री प्रदीप गोपाळ यांचा अखिल भारतीय नाट्य परिषद व के.वाय.के.एम या संस्थेच्या वतीने स्मृती चिन्ह , प्रमाणपत्र , गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला
0 Comments
|
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |