Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
धुळे : तळागाळातील युवकांचा भाषण कौशल्याने विकास व्हावा आणि भावी पिढीला वक्तृत्वाचा छंद लागावा या उद्देशाने के.वाय.के.एम फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित "महाराष्ट्र शब्दरंग करंडक-२०२२" वक्तृत्व स्पर्धेचे दुसरे पर्व धुळ्यात पार पडले. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला, स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रदीपजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेत वक्तृत्वाचे महत्व अधोरेखित केले तर स्वच्छता आणि वक्तृत्व याबाबत मार्गदर्शन केले, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्रजी सोनवणे यांनी वक्तृत्वाचे प्राचीन काळापासून असलेले नाते आणि आजची परिस्थिती यावर मत व्यक्त केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजसेवक श्री.अमोल (बंटी) मासुळे यांनी एका वक्त्याने भविष्यातील इतर पाच वक्ते घडवावे असे प्रतिपादन केले. स्पर्धेच्या मध्यांतरांतर भोजनाची व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात आली होती, बक्षीस समारंभ कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी श्री.अशोककुमार मेघवाल उपस्थित होते, यावेळी एका भाषणाने युद्ध होऊ शकते, तर एका भाषणाने युद्ध थांबू देखील शकते असे मत त्यांनी मांडले. परीक्षक म्हणून एस.जी.एम.सी.टी संस्थेचे अध्यक्ष श्री.योगेश्वर आव्हाळे यांनी पारदर्शक पद्धतीने गुणदान करून योग्य निकाल दिला, तर वक्त्यांच्या त्रुटी दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचनाचा सल्ला देखील सांगितला. के.वाय.के.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.मोहनिश वाडेकर यांनी स्वानुभव सांगून हरलेल्या वक्त्याने इतरांना वक्ता बनविण्यासाठी प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रफुल्ल माळी, द्वितीय संकेत पाटील, तृतीय दर्शना राजपूत, उत्तेजनार्थ प्रसाद जगताप आणि निर्मिती वैद्य, श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा वक्ता रोहीत ठाकूर, तर शब्दरंग विशेष हर्षदा पाटील यांनी पारितोषिके पटकविले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयोजन अध्यक्ष कल्पेश बोरसे, खजिनदार चेतन उपाध्याय, संचालक सदस्य निलेश तेलंग, सूत्रसंचालन प्रसाद महाले, स्नेहा बडगुजर, दिव्या सावळे, ज्ञानेश्वरी बिडवे, हर्षदा बडगुजर, भाग्यश्री भावसार, प्रियंका विसपुते, मानसी शिसोदे, अश्वघोष पवार, प्राजक्ता अहिरराव, मुकेश फलके, जागृती मोगरे यांनी मेहनत घेतली.
0 Comments
धुळे : युवकांनी युवकांच्या वतीने समाज कार्यासाठी सुरू केलेल्या के.वाय.के.एम फाऊंडेशन या संस्थेला वर्षपूर्ती होत आहे. यानिमित्ताने प्रथम वर्धापनदिन साजरा करण्यासाठी "वार्षिक सभासदत्व प्रदान आणि अहवाल अवलोकन" कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. हेमंत जोशी उपस्थित होते, त्यांनी के.वाय.के.एम हे युवकांनी घडवलेल्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे संच असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करतांना संस्थेचे सचिव कल्पेश बोरसे यांनी २०२१-२०२२ या वर्षात संस्थेच्या माध्यमातून समाजासाठी केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला, यात औरंगाबाद येथे शिवजयंती निमित्ताने प्रश्नमंजुषा, शब्दरंग करंडक वक्तृत्व स्पर्धा-२०२१, लसीकरण मोहीम अंतर्गत १२०० लोकांचं लसीकरण, शिक्षक दिनानिमित्त शालेय वस्तू वाटप, शिरपूर येथील वस्तीत खाद्यपदार्थ वाटप, नवरात्रीनिमित्ताने अवधान येथील आदिवासी पाड्यावर प्रकल्प "सक्षम" अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सॅनिटरी पॅड वाटप उपक्रम सुरू, औरंगाबाद येथे निबंध स्पर्धा, कोजागिरी पौर्णिमेला रस्त्यावरील गरिबांना अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते दूध वाटप, वृद्धाश्रमात प्रकल्प आनंद चे उद्घाटन, दीपावली पाडवा निमित्ताने "एक दिवा शहिदांसाठी" कार्यक्रम, एस.टी.कर्मचारी यांच्या मनोरंजनाकरिता जादूचे प्रयोग, प्रकल्प आधार अंतर्गत आदिवासी वस्तीत कपडे वाटप, कोरोना जनजागृती अभियान अंतर्गत मास्क, साबण, सॅनिटायझर वाटप, गरिबांचा सांता उपक्रमा अंतर्गत रस्त्यावरील गोरगरिबांना ब्लॅंकेट आणि चादर वाटप, असे अनेक उपक्रम वर्षभरात राबविण्यात आल्याची माहिती दिली.त्यानंतर २०१८ ते २०२२ पर्यंत के.वाय.के.एम फाऊंडेशनची वाटचाल धुळे ते महाराष्ट्र राज्य कशी झाली आणि त्यामुळे समाजात काय बदल काय झाला यावर संस्थेचे सहसचिव चेतन उपाध्याय यांनी मत व्यक्त केले. या वर्धापनदिनी दिव्या सावळे, ज्ञानेश्वरी बिडवे, कल्याणी मोरे, स्नेहा बडगुजर, प्रियंका विसपुते, राखी बडगुजर, हर्षदा बडगुजर, मानसी शिसोदे, अश्वघोष पवार यांना सभासदत्व प्रदान केले गेले. त्यानंतर त्यांना "प्रकल्प समन्वयक" पदाचा कार्यभार देण्यात आला. तसेच नव्याने स्वयंसेवक झालेल्या सदस्यांना ओळखपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक समिती सदस्य निलेश तेलंग, स्वयंसेवक साक्षी जाधव, भाग्यश्री भावसार, हर्षदा जाधव, संजना सरख, दिव्या गवळी, गौतमी कुलकर्णी, प्रसाद महाले, लवेश मोरे, भाग्येश मोरे उपस्थित होते. या वर्धापनदिन निमित्ताने श्री.गणेश शेजुळ यांच्या परिवारातर्फे स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. नेहरू युवा केंद्र,धुळे आणि के.वाय.के.एम फाऊंडेशनतर्फे कोरोना नियमानुसार स्पर्धा आयोजित. धुळे : भारत सरकार युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र, धुळे आणि के.वाय.के.एम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लॉकडाऊन नंतरचा पहिला "धुळे युवा महोत्सव" सांस्कृतिक स्पर्धा-२०२१ चे आयोजन करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन व्हावे या उद्देशाने दिनांक १७ डिसेंबर ते २६ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन नोंदणी करून स्पर्धकांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली तर २७ डिसेंबर रोजी धुळे जिल्ह्यातील एस.एस.व्ही.पी.एस.कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या ओडिटोरियम हॉल येथे लॉकडाऊन नंतरचा पहिला "धुळे युवा महोत्सव" सांस्कृतिक स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत नृत्य, नाट्य, गायन या कलाप्रकारात जिल्ह्यातील सर्व स्तरातील युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व्यवस्थापन समिती सदस्य श्री. मोहन पावरा सर आणि सिनेट सदस्य श्री.विलासजी चव्हाण सर तर अध्यक्ष स्थानी श्री. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.मनोहर पाटील सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरू युवा केंद्र, धुळे जिल्हा युवा कार्यक्रम अधिकारी श्री. अशोक कुमार मेघवाल यांनी केले. दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आणि स्पर्धेला सुरुवात झाली. यात भारतीय संस्कृतीच्या अनेक प्राचीन व आधुनिक कलेच्या भरतनाट्यम, हिपहॉप, लावणी, गीतगायन, मिमिक्री, एकपात्री नाट्य, रॅप, इत्यादी प्रकारात स्पर्धकांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. स्पर्धेचे परीक्षण श्री.मुकेश तायडे, सौ.रत्ना वाघ आणि श्री.सदाशिव सूर्यवंशी यांनी केले. स्पर्धेतील सादरीकरणानंतर स्पर्धकांना अल्पोपहार देण्यात आला आणि त्यानंतर बक्षीस वितरण करण्यात आले. नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक युग बागुल, द्वितीय आंचल निकम, तृतीय शेखर शिंदे, उत्तेजनार्थ मयूर मनोरे, नाट्य स्पर्धेत प्रथम हर्षदा शेलार, द्वितीय कल्याणी क्षीरसागर, उत्तेजनार्थ कावेरी राजपूत, तर गायन स्पर्धेत प्रथम ललित पाटील, द्वितीय रेखा पाटील, तृतीय रुपाली बोरसे, उत्तेजनार्थ जयेश सूर्यवंशी यांनी पटकावला.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी के.वाय.के.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिश वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, मार्गदर्शक निलेश तेलंग, स्वयंसेवक अश्वघोष पवार, हेमराज पाटील, दिव्या सावळे, ज्ञानेश्वरी बिडवे, कल्याणी मोरे, प्रियंका विसपुते, साक्षी जाधव, दिव्या गवळी, हर्षदा जाधव, मानसी शिसोदे, गौतमी कुलकर्णी,भाग्यश्री भावसार, संजना सरख, एस.एस.व्ही.पी.एस कला व वाणिज्य महाविद्यालयचे श्री.निलेश पाटील, नेहरू युवा केंद्राचे ललित पाटील यांनी परिश्रम घेतले. धुळे : जगावर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या जागतिक महामारी असलेल्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव सध्या स्थितीत जरी कमी झाला असला तरी देखील तो संसर्गजन्य विषाणू असल्या कारणाने त्यास आळा घालण्यासाठी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र धुळे जिल्हा आणि के.वाय.के.एम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "कोरोना जनजागृती मोहीम" अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान नेहरू युवा केंद्राचे धुळे जिल्हा युवा कार्यक्रम अधिकारी अशोककुमार मेघवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या अभियानाचा दुसरा टप्पा जुने धुळे येथील सुपडू आप्पा कॉलनीतील सावता माळी शाळेजवळ पार पडला. यात संस्थापक सहसचिव चेतन उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली मास्क वापरण्याचे महत्व पटवून देण्यात आले तसेच, योग्य मास्क वापरावयाची पध्दत शिकविण्यात आली. त्याचबरोबर स्वयंसेविका ज्ञानेश्वरी बिडवे यांनी साबण वाटप करून कशाप्रकारे ३० सेकंड हात स्वच्छ धुवायला हवेत याचे प्रात्यक्षिक करवून घेतले. तर स्वयंसेविका दिव्या साळवे यांनी सॅनिटायझरचे वाटप करून सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी नियमितपणे नियम पालन करण्याची शपथ दिली. यावेळी महिला, पुरुष आणि बाल वर्ग उपस्थित होते. माझ्या परिवाराचे संरक्षण माझी जबादारी असल्याने मी कोरोना रोखण्यासाठी प्रामाणिकपणे नियमांचे पालन करून कोरोनाला पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन नागरिकांतर्फे देण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनिश वाडेकर,संस्थापक सचिव कल्पेश बोरसे,संस्थापक सहसचिव चेतन उपाध्याय, संस्थापक सदस्य जागृती मोगरे तसेच स्वयंसेवक दिव्या साळवे, कल्याणी मोरे, ज्ञानेश्वरी बिडवे, साक्षी जाधव, राखी बडगुजर, प्रियंका विसपुते, भाग्यश्री भावसार, गौतमी कुलकर्णी, प्रियंका राजपूत, स्नेहा बडगुजर, हर्षदा बडगुजर, दिव्या गवळी, देवयानी वाघ, अविनाश पाटील, तुषार देसले, प्रसाद महाले, लवेश मोरे, निलेश तेलंन, अश्वघोष पवार, गणेश शेजुळ , गोपाल बडगुजर, सुकदेव बडगुजर आदी उपस्थित होते. #साबण आणि #मास्क वाटून नियमित वापरण्याची #शपथ
धुळे : जागतिक महामारी असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी संसर्गजन्य विषाणू असल्याने पुन्हा सक्रिय होऊ शकतो या परिणामाचे पूर्वनियोजन करण्यासाठी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र धुळे जिल्हा आणि के.वाय.के.एम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "कोरोना जनजागृती मोहीम" अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान नेहरू युवा केंद्राचे धुळे जिल्हा युवा कार्यक्रम अधिकारी अशोककुमार मेघवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या अभियानाचा प्रथम टप्पा चाळीसगाव रोड परिसरातील, पश्चिम हुडको भागात पार पडला, यात साबण वाटप करून कशाप्रकारे ३० सेकंड हात धुवायला हवे याची पध्दत शिकविण्यात आली, तसेच मास्क वाटप करून नियमितपणे मास्कचा वापर करण्याची शपथ देण्यात आली. यावेळी येत्या काळात कोरोना प्रादुर्भावा पासून संरक्षण म्हणून हात धुणे, मास्कचा नियमित वापर करणे, आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवणे हेच आपले कवच आहे असे मार्गदर्शन के.वाय.के.एम चे सचिव कल्पेश बोरसे यांच्या कडून करण्यात आले. यावेळी के.वाय.के.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिश वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, कल्याणी मोरे, दिव्या सावळे, ज्ञानेश्वरी बिडवे, साक्षी जाधव, राखी बडगुजर, प्रियंका विसपुते, भाग्यश्री भावसार, गौतमी कुलकर्णी, गणेश शेजुळ, ललिता पारीख उपस्थित होते. धुळे : "एक हात मदतीचा" या संकल्पनेतून के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या प्रकल्प "आधार" अंतर्गत नगाव गावाजवळील स्थलांतरित आदीवासी वस्तीत वापरायोग्य कपडे व साड्यांचे वाटप करण्यात आले. यासाठी सदगुरु सेवा प्रतिष्ठान, वारजे चे संस्थापक सचिन म्हसे यांच्या वतीने पुण्यात तर के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या स्वयंसेवका दिव्या, ज्ञानेश्वरी, कल्याणी, राखी, स्नेहा, प्रियंका, गौतमी, साक्षी,भाग्यश्री आदींनी धुळे जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे कपड्यांचे संकलन केले. तसेच येत्या काळात या वस्तीतील लोकांना आरोग्य तपासणी बाबत शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. यावेळी के.वाय.के.एम.फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिश वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, दिव्या सावळे, ज्ञानेश्वरी बिडवे, प्रियंका विसपुते, स्नेहा बडगुजर, साक्षी बडगुजर, राखी बडगुजर,साक्षी जाधव, हर्षदा जाधव, गौतमी कुलकर्णी, दिव्या बिर्हाडे, विजयंता बिर्हाडे, कल्याणी मोरे, गणेश शेजुळ, अश्वघोष पवार, प्रसाद महाले, लवेश, निलेश, रवीद्र चौधरी आदी उपस्थित होते. के.वाय.के.एम फाऊंडेशन तर्फे जादूचे प्रयोग सादरीकरण करून एस.टी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविले.18/11/2021 धुळे : सध्या महाराष्ट्रात एस.टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, या संपला अनेक माध्यमातून पाठिंबा मिळत आहे, त्यानुसार धुळे जिल्ह्यातील एस.टी डेपो येथे सुरू असलेल्या संपाला रोज सर्व कर्मचारी उपस्थित राहतात, त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळावी आणि मनोबल वाढावे या उद्देशाने के.वाय.के.एम फाऊंडेशन, धुळे तर्फे प्रकल्प "आनंद" अंतर्गत सुप्रसिद्ध युवा जादूगार चेतनकुमार यांचे अदभूत अविश्वसनीय जादूचे प्रयोग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदरील कार्यक्रमात के.वाय.के.एम फाऊंडेशनचे सचिव कल्पेश बोरसे यांनी सहानुभूती पूर्वक कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा विचार करून लवकरच संपावर तोडगा निघेल आणि पुन्हा लालपरी धावेल अशी अपेक्षा व्यक्त केली, तद्नंतर जादूगार चेतनकुमार यांनी जादूच्या माध्यमातून ३८ एस.टी. कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, आणि सर्वांचे मनोरंजन केले. कामगार संघटनेचे रुपेंद्र तायडे व इतर पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाद्वारे संपाला बळ मिळाले आणि मनोबल वाढले यासाठी आभार व्यक्त केले.
यावेळी के.वाय.के.एम फाऊंडेशनचे सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, स्वयंसेवक दिव्या सावळे, ज्ञानेश्वरी बिडवे, प्रियंका विसपुते, स्नेहा बडगुजर, प्रियंका विसपुते, भाग्यश्री भावसार, कल्याणी मोरे आदी उपस्थित होते. धुळे : आदिवासी पाड्यावरील स्त्रियांना प्रत्येक महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या वेळी महागडे सॅनिटरी पॅड विकत घेणे परवडत नसल्याने अस्वच्छ कापड वापरून आजाराच्या आहारी जावे लागते. याबाबत महिलांना सॅनिटरी पॅड वापराबाबत सक्षम करण्यासाठी के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या प्रकल्प "सक्षम" अंतर्गत खुशीयांन फाऊंडेशनच्या साहाय्याने अवधान येथील वानरदेव वस्ती आणि एकलव्य नगर येथील आदिवासी पाड्यावर सॅनिटरी पॅड वाटण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा हा दुसरा महिना होता, या उपक्रमासाठी खुशीयांन फाऊंडेशनचे संस्थापक चिनू क्वात्रा आणि प्रकल्प समन्वयक तसेच के.वाय.के.एम चे महाराष्ट्र व्यवस्थापन समिती सदस्य वैभव गायकवाड यांच्या वतीने सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यात आले, तसेच हे पॅड पुनःवापरता येण्यायोग्य आहेत.
तसेच प्रकल्प "सक्षम" च्या माध्यमातून मासिक पाळीच्या वेळी कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत दिव्या सावळे यांनी समुपदेशन केले. या कार्यक्रमासाठी के.वाय.के.एम फाउंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर आणि सहसचिव चेतन उपाध्याय हे उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे नियोजन के.वाय.के.एम च्या स्वयंसेविका ज्ञानेश्वरी बिडवे, भाग्यश्री भावसार, प्रियंका विसपुते, गौतमी कुलकर्णी, अविनाश पाटील, गणेश शेजुळ यांनी केले. Highlights 👇🏻👇🏻 https://youtu.be/Y1ZwvBYzIBQ धुळे : दिवाळी सणाच्या दिवशी देखील सीमेवर देश संरक्षणासाठी सज्ज असलेल्या भारतीय जवानांच्या कार्याला सलामी देण्यासाठी आणि देशासाठी सेवा बजावतांना शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून के.वाय.के.एम फाऊंडेशन,धुळे तर्फे दीपावलीच्या शुभ दिनी धुळे शहरातील शिवतीर्थ चौकातील शहीद अब्दुल हमीद अन्सारी यांच्या स्मरकाभोवती दीपप्रज्वलन करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते प्रथम दीप प्रज्वलित करून दीपप्रज्वलनाला सुरुवात केली, त्यांतर शहीद स्मारक, शिवतीर्थ आणि रणगाड्याभोवती दीप प्रज्वलित करण्यात आले, तसेच दिव्यांनी भारताचा नकाशा करून एक दिवा शहिदांसाठी संकल्पना दाखविण्यात आली. रस्त्यावरील नागरिकांनी दीपप्रज्वलन करून तर काहींनी दीपदान करून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे आयोजन के.वाय.के.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, संस्थापक सदस्य मुकेश फलके आणि जागृती मोगरे यांनी केले, तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिव्या सावळे, ज्ञानेश्वरी बिडवे, भाग्यश्री भावसार, प्रियंका पाटील, हेमराज, समाजसेवक श्री.रवींद्र पवार आणि भारतीय सैन्य दलातील जवान श्री.भूषण पाटील यांनी परिश्रम घेतले. धुळे (नगाव) : के.वाय.के.एम फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक सहसचिव चेतन उपाध्याय यांच्या मातोश्री सौ. ललिता उपाध्याय (पारीख) यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने नागाव येथील आनंद विहार वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्तींसाठी प्रसिद्ध जादूगार चेतनकुमार यांचे अदभूत अविश्वसनीय जादूचे प्रयोग सादर करून जन्मदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सर्व वृद्धांना भेटून ललिता उपाध्याय (पारीख) यांनी तब्येतीची विचारणा करून आशीर्वाद घेतले. तदनंतर सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून सर्वांनी त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या, यानंतर चेतनकुमार यांनी जादूचे प्रयोग दाखवून कार्यक्रम सादर केला. येथील वृद्धाश्रमात ३० वर्षांपासून अनेक वृद्ध आजी-आजोबांनी सहारा घेतला आणि कालांतराने त्यांना त्यांच्या परिवाराने पुन्हा आपलेसे केले. मात्र एवढ्या वर्षात अश्या प्रकारे आईचा जन्मदिवस साजरा करण्याची संकल्पना कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आनंद विहार येथील अध्यक्ष नानासो शशिकांत भदाणे यांनी केले. तसेच भविष्यात के.वाय.के.एम तर्फे प्रकल्प "आधार" च्या माध्यमातून या सर्व वृद्धांना आधार देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे असे आश्वासन के.वाय.के.एम फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य सचिव कल्पेश बोरसे यांनी दिले. यावेळी के.वाय.के.एम चे सहसचिव चेतन उपाध्याय, आनंद विहार च्या मुख्याध्यापिका शीतल पाटील, उपस्थित होते, कार्यक्रमासाठी शिक्षिका भारती सोनवणे, आशा शिंदे, मंगला वाघ, नंदकिशोर निकम, निलेश जाधव यांनी सहकार्य केले.
के वाय के एम च्या औरंगाबाद विभागातर्फे नागरिकत्व, कायदा, संविधान, कार्य आणि कर्तव्ये व पर्यावरण20/10/2021
औरंगाबाद : श्री स्वामी समर्थ केंद्र येथे के वाय के एम फाऊंडेशन मराठवाडा प्रमुख यांनी प्रकल्प "सक्षम" च्या माध्यमातून वृद्ध आणि लहान मुलांना मार्गदर्शन केले, यात के वाय के एम तर्फे घेण्यात येणाऱ्या निबंध स्पर्धेची माहिती देण्यात आली व त्याच बरोबर नागरिकत्व, कायदा, संविधान कार्य आणि कर्तव्ये व पर्यावरण संवर्धन याविषयी माहिती दिली.
के.वाय.के.एम फाऊंडेशन आणि सद्गुरु सेवा प्रतिष्ठान तर्फे अप्पर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रदीप पवार, नेहरू युवा केंद्र धुळे जिल्हा अधिकारी श्री.अशोक कुमार मेघवाल यांच्या हस्ते दूध वाटप धुळे : कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने धुळे जिल्ह्यातील रस्त्यावर राहणाऱ्या, निराधार, अनाथ, लोकांना के.वाय.के.एम फाऊंडेशन, धुळे आणि सदगुरु सेवा प्रतिष्ठाण, वारजे,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने "दूध-तुमच्यासाठी पण..!" या कार्यक्रमाद्वारे मसाला दूध वाटप करण्यात आले. वाटपाची सुरुवात धुळे जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते पांझरा नदीकाठच्या मस्जिद जवळील गरीब लोकांना मसाला दूध वाटून करण्यात आली, यावेळी त्यांनी लोकांना परिस्थिती बाबत विचारणा केली, त्यांची कारणे जाणून घेतली. तसेच धुळे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रदीप पवार आणि यांच्या हस्ते एकविरा देवी मंदिर परिसरात वाटप करण्यात आले, या उपक्रमात पवार साहेब स्वतःहून संस्थेच्या स्वयंसेवकांचे मनोबल वाढविण्यासाठी सोबत होते. त्यानंतर सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे नेहरू युवा केंद्राचे धुळे जिल्हा अधिकारी श्री.अशोक कुमार मेघवाल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, तसेच या कार्यक्रमासाठी मिशन क्लीन इंडिया अंतर्गत दूध वाटपानंतर कचरा संकलन करण्यासाठी वेस्टज बॅग देखील त्यांनी उपलब्ध करून दिल्या. सदरील कार्यक्रमासाठी सद्गुरू सेवा प्रतिष्ठान, वारजे, पुणे या संस्थेचे अध्यक्ष श्री.सचिन म्हसे यांनी दूध आणि इतर साहित्य उपलब्ध करून दिले.तसेच युवकमित्र परिवाराचे संस्थापक श्री.प्रवीण महाजन यांनी देखील धावती भेट देऊन उपक्रमाबाबत माहिती घेतली आणि स्वयंसेवकांचे कौतुक केले.
यावेळी के.वाय.के.एम फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, संस्थापक सदस्य जागृती मोगरे, स्वयंसेवक अश्वघोष पवार, नेहरू युवा केंद्र धुळे कर्मचारी ललित पाटील उपस्थित होते, उपक्रमासाठी आचारी गोपाल महाराज आणि मयूर चौधरी यांनी विनाशुल्क मदत केली. वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळेत न जाणाऱ्या आदिवासी मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य आणि शिक्षण...!15/10/2021
के.वाय.के.एम फाऊंडेशन आणि सदगुरु सेवा प्रतिष्ठान, वारजे, पुणे यांचा संयुक्त उपक्रम धुळे : वाचन प्रेरणा दिनानिमित्त अवधान येथे के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या प्रकल्प "शिक्षा" चे प्राथमिक उद्घाटन करण्यात आले, तसेच त्याअंतर्गत के.वाय.के.एम फाऊंडेशन, धुळे आणि सदगुरु सेवा प्रतिष्ठान, वारजे, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी वस्तीतील शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नवदुर्गा रूपाने कार्यक्रमात उपस्थित महिलांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यासाठी सदगुरु सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री.सचिन नामदेव म्हसे यांनी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. आदिवासी वस्तीत परराज्यातील स्थलांतरित तसेच अशिक्षित लोकांची संख्या जास्त असून आई-वडिलांना शिक्षणाचा देखील अभाव आहे, आणि यामुळे त्यांच्या पाल्यांचे भविष्य अंधारात जात आहे, मात्र त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रकल्प "शिक्षा" कार्यरत असणार आहे असे प्रस्ताविक के.वाय.के.एम महाराष्ट्र चे सचिव कल्पेश बोरसे यांनी केले. तर येत्या काळात संपूर्ण विद्यार्थ्यांना इतर शैक्षणिक साहित्य देखील उपलब्ध करून शिक्षणाची गोडी लावून शाळेत प्रवेश करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन संस्थेचे सहसचिव चेतन उपाध्याय यांनी केले. प्रकल्प "शिक्षा" च्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांना स्वयंसेविका दिव्या साळवे या विनाशुल्क रोज शिक्षणाचे धडे देणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.वाय.के.एमचे धुळे जिल्हाध्यक्ष प्रसाद महाले यांनी केले, तर कार्यक्रमाचे आयोजन योगिता साळवे,लताबाई वाघ, मोहिनी समाधान पाटील, सविता गोपाल बिल, वैशाली वाघ, पुनम पाटील,ज्योती कोळी, दिव्या साळवे या स्थानिक रहिवासींनी केले.
प्रकल्प "आधार" अंतर्गत प्रत्येक महिन्यालापॅड वाटप करण्याचा संकल्प..! धुळे : आदिवासी पाड्यावरील स्त्रियांना प्रत्येक महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या वेळी महागडे सॅनिटरी पॅड विकत घेणे परवडत नसल्याने अस्वच्छ कापड वापरून आजाराच्या आहारी जावे लागते. या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या प्रकल्प "सक्षम" अंतर्गत खुशीयांन फाऊंडेशनच्या साहाय्याने अवधान येथील वानरदेव वस्ती आणि एकलव्य नगर येथील आदिवासी पाड्यावर सॅनिटरी पॅड वाटण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी खुशीयांन फाऊंडेशनचे संस्थापक चिनू क्वात्रा आणि प्रकल्प समन्वयक तसेच के.वाय.के.एम चे महाराष्ट्र व्यवस्थापन समिती सदस्य वैभव गायकवाड यांच्या वतीने सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यात आले, विशेष म्हणजे हे पॅड स्वतः वैभव गायकवाड यांनी घरी तयार केलेले असून इको फ्रेंडली आणि पुनःवापरता येण्यायोग्य आहेत. या नवरात्री निमित्ताने ४०० पॅड वाटप करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
तसेच प्रकल्प "सक्षम" च्या माध्यमातून मासिक पाळीच्या वेळी कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत दिव्या सावळे यांनी समुपदेशन केले. तर येत्या काळात प्रत्येक महिन्यात १०० महिलांना पॅड देण्याचा उद्देश के.वाय.के.एम तर्फे ठेवण्यात आला आहे असे प्रतिपादन रीना पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी के.वाय.के.एम फाऊंडेशनचे संस्थापक सहसचिव चेतन उपाध्याय आणि धुळे जिल्हाध्यक्ष प्रसाद महाले हे उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे नियोजन के.वाय.के.एम च्या स्वयंसेविका दिव्या सावळे आणि रीना पाटील यांनी केले. धुळे : के.वाय.के.एम फाऊंडेशन, महाराष्ट्र तर्फे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अरुणावती नदी काठी वसलेल्या खर्दे बु. या गावातील शनी मंदिर परिसरात असणाऱ्या पाड्यावरील लहान मुलांची आरोग्य तपासणी आणि शैक्षणिक पाहणी करण्यासाठी दिनांक २८ रोजी के.वाय.के.एम चे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय यांनी दौरा केला. यावेळी तेथील मुलांना बिस्कीटे वाटप करण्यात आली, खेळ आणि जादूचे प्रयोग दाखवून मनोरंजन करण्यात आले. तसेच संस्थेचे शिरपूर तालुक्यातील पदाधिकारी यांची आढावा बैठक घेऊन येत्या काळात या वस्तीत काय सुधारणा करण्यात येतील यावर चर्चा झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, शिरपूर तालुकाध्यक्ष गणेश चौधरी, तालुका सचिव हर्षदा सैंदाणे, स्वयंसेवीका प्रियंका कोळी उपस्थित होते. धुळे : के.वाय.के.एम फाऊंडेशच्या प्रकल्प "शिक्षा" अंतर्गत अवधान गावात लहान मुलांना रोज शिक्षणाचे धडे शिकवले जातात, मात्र शिक्षक दिनाच्या निमित्ताने स्वयंसेविका दिव्या सावळे व रीना पाटील यांनी गावातील विद्यार्थ्यांना कोरोना काळात दुरावलेल्या शिक्षक आणि शाळा यांचं महत्त्व पटवून देण्यासाठी रोज जे मुलं-मुली विद्यार्थी म्हणून दैनंदिन तासिका शिकण्यासाठी येत असतात, त्यांच्यातील एका चिमुकल्या कु.साक्षी ज्ञानेश्वर पाटील या मुलीला शिक्षक बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले, आणि या मुलींने अगदी नियमितपणे जसं शिक्षक शिकवतात तश्याच रीतीने अगदी शिस्तबद्ध पध्दतीने विद्यार्थ्यांना आज शिकवलं. या विद्यार्थ्यांना के.वाय.के.एम कडून नियमितपणे शिक्षण आणि शिक्षणविषयक वस्तू दिल्या जाणार आहेत.
के.वाय.के.एम फाऊंडेशनतर्फे प्रकल्प "शिक्षा" अंतर्गत कार्यरत शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या पूर्वसं5/9/2021
धुळे : के.वाय.के.एम फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या धुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांतर्फे संस्कार कंप्यूटर्स येथील संचालक वर्षा बनछोड मॅडम,अभिजीत बनछोड सर तसेच स्टाफ मेंबर्स ज्ञानेश्वर खैरनार, यशश्री चौधरी, गायत्री पवार ह्या शिक्षकांचा शिक्षक दिनाच्या पुर्वसंध्येला सत्कार करण्यात आला. कोरोना महामारी काळात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील शिक्षकांनी ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिल्याबद्दल त्यांचा शिक्षक दिनानिमित्त सत्कार करण्यात आला असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले, यावेळी के.वाय.के.एम फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे सहसचिव चेतन उपाध्याय, जिल्हाध्यक्ष प्रसाद कन्हैयालाल महाले आदी उपस्थित होते.
धुळे : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या औचित्याने के.वाय.के.एम फाऊंडेशनचे धुळे जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या वतीने जिल्ह्यातील खान्देश गोशाळा येथे गौमातेला चारा वाटप करण्यात आला. येत्या काळात या गोशाळेत संस्थेच्या तर्फे वस्तू भेट देण्यात येणार आहेत तसेच तेथे सफाई करून परिसर स्वच्छ करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी के.वाय.के.एम फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे सहसचिव चेतन उपाध्याय, जिल्हाध्यक्ष प्रसाद कन्हैयालाल महाले आदी उपस्थित होते.
धुळे : के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्याचा पुढाकार घेण्यात येतो त्यातील "प्रकल्प सक्षम" या अंतर्गत स्त्रियांविषयक उपक्रम आणि समुपदेशन करण्यात येत असते. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील अवधान परिसरात कोरोना महामारीच्या नियमांचे उल्लंघन न करता प्रकल्प सक्षम द्वारे के.वाय.के.एम च्या युवती स्वयंसेवकांनी प्रत्येक घरोघरी जाऊन समुपदेशन केले. यात महिलांच्या समस्या जाणून घेतल्या, आणि त्यांना स्त्रीविषयक कोणत्या गरजू वस्तू मिळत नाही याची पूर्ण माहिती संकलित करण्यात आली. लवकरच संस्थेच्या वतीने या सर्व स्त्रियांना स्त्री विषयक गरजू वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. हे समुपदेशन दिव्या साळवे व रिना पाटील या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे पूर्ण केले.
"मोफत (Covaxin) करोना लसीकरण अभियान" मोहिमेअंतर्गत लसीकरण पूर्ण करणार..! धुळे: करोना महामारीला आळा घालण्यासाठी आणि तिसऱ्या लाटेपासून नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या वतीने धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव रोड परिसरात सर्व्हे करण्यात आला. दिनांक ३ ऑगस्ट रोजी डॉ.मिरजकर नगर, पंचवटी नगर आणि पश्चिम हुडको या परिसरात हा सर्व्हे झाला, त्यात २५० घरातील १३० नागरिकांचे लसीकरण बाकी असल्याचे निदर्शनास आले. तसेच दिनांक ०४ ऑगस्ट रोजी पवन नगर, चाळीसगाव रोड या परिसरात हा सर्व्हे करण्यात आला, येथे १५० घरातील १०६ नागरिक लसीकरण बाकी असल्याचे निदर्शनास आले. हा सर्व्हे स्वतः के.वाय.के.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय आणि संस्थापक सदस्य मुकेश फलके ह्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला आणि त्यात महत्वाची बाब म्हणजे या सर्व नागरिकांची प्रथम लस बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या सर्व्हेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रथम लस बाकी असणाऱ्या नागरिकांना के.वाय.के.एम फाऊंडेशन आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "मोफत (Covaxin) करोना लसीकरण अभियान" याअंतर्गत खान्देश कॅन्सर सेंटर हॉस्पिटल,धुळे या ठिकाणी दिनांक ५,६,७ ऑगस्ट रोजी लसीकरण करण्यात येणार आहे. आवाहन के.वाय.के.एम फाऊंडेशन आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्यातील नागरिकांचे झपाट्याने लसीकरण करण्यासाठी "मोफत (Covaxin) करोना लसीकरण अभियान' आयोजित करण्यात आले आहे. दिनांक ०५, ०६, ०७ ऑगस्ट रोजी खान्देश कॅन्सर सेंटर, सुरत बायपास रोड, नवीन सिव्हिल हॉस्पिटलजवळ, धुळे या ठिकाणी हे अभियान आयोजित करण्यात आले आहे. ज्या नागरिकांची प्रथम किंवा द्वितीय लस घेण्याची बाकी असेल त्यांनी लसीकरण करण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक सोबत घेऊन लसीकरणाच्या ठिकाणी उपस्थित रहावे. आपली नोंदणी करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असून आपणास PPE किट देखील उपलब्ध करून दिली आहे. कृपया फक्त COVAXIN या लसीचा प्रथम आणि द्वितीय डोस उपलब्ध आहे याची नोंद घ्यावी. धुळे : करोना महामारीला आळा घालण्यासाठी आणि तिसऱ्या लाटेपासून नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी के.वाय.के.एम फाऊंडेशन आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "मोफत (Covaxin) करोना लसीकरण अभियान" प्रथम टप्पा ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान यशस्वी संपन्न झाला. २८ जुलै रोजी प्रायोगिक तत्वावर या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
या अभियानासाठी के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या वतीने धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव रोड परिसरात सर्व्हे करण्यात आला. दिनांक ३ ऑगस्ट रोजी डॉ.मिरजकर नगर, पंचवटी नगर आणि पश्चिम हुडको या परिसरात हा सर्व्हे झाला, त्यात २५० घरातील १३० नागरिकांचे लसीकरण बाकी असल्याचे निदर्शनास आले. तसेच दिनांक ०४ ऑगस्ट रोजी पवन नगर, चाळीसगाव रोड या परिसरात हा सर्व्हे करण्यात आला, येथे १५० घरातील १०६ नागरिक लसीकरण बाकी असल्याचे निदर्शनास आले. हा सर्व्हे स्वतः के.वाय.के.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय आणि संस्थापक सदस्य मुकेश फलके ह्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला आणि त्यात महत्वाची बाब म्हणजे या सर्व नागरिकांची प्रथम लस बाकी असल्याचे स्पष्ट झाले. लसीकरण बाकी असलेल्या सर्व नागरिकांचे खान्देश कॅन्सर सेंटर हॉस्पिटल,धुळे या ठिकाणी दिनांक ५,६,७ ऑगस्ट रोजी लसीकरण करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील रानमळा, मोहाडी, वाडीभोकर रोड, मिल परिसर, कॉटन मार्केट, इत्यादी दुरवरील ठिकाणच्या लोकांनी लसीकरण पूर्ण करण्यासाठी स्वइच्छा दाखवली. या सर्वांना द्वितीय डोस देखील या उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच अभियानाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येईल.ज्यात प्रथम लस बाकी असलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात येईल. हे अभियान यशस्वी करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनचे राज्य समन्वयक श्री.दिपक केकन आणि व्यवस्थापक श्री. शुभम लाखकर, के.वाय.के.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, संस्थापक सदस्य मुकेश फलके आणि जागृती मोगरे यांनी परिश्रम घेतले. कोरोना काळात माता-पितांच्या हस्ते ऑनलाइन पारितोषिक वितरणाचा प्रथम प्रयोग यशस्वी
के.वाय.के.एम फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यातर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने "महाराष्ट्र शब्दरंग करंडक-२०२१" राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे ऑनलाईन माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. युवकांनी सामाजिक विषयावर भाष्य करून वक्ता म्हणून सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन २०१८ सालापासून करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या काळात २०२१ या वर्षासाठी दिनांक १४ मार्च ते २४ मार्च या कालावधीत ही स्पर्धा ऑनलाइन माध्यमातून राबविण्यात आली, यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सध्याच्या परिस्थितीला अनुसरून या वर्षीच्या विषयांची निवड करण्यात आली होती (त्यात करून जावे बरेच काही या दुनियेतुन जाताना, महिलांची लढाई - अनैतिकतेशी!, करोना : एक संकट की संधी, राजकारण आणि आजचा युवक, शेतकरी : एका काळचा राजा हे विषय होते). स्पर्धेचा निकाल २७ मार्च रोजी संस्थेच्या वेबसाईटवर घोषित करण्यात आला त्यानुसार प्रथम क्रमांक संघमित्रा गायकवाड (पुणे), द्वितीय क्रमांक निलेश माने (जळगाव) आणि तृतीय क्रमांक सौरभ पाटील (कोल्हापूर) यांनी पटकाविला, परंतु कोरोना महामारी मुळे सुरू असलेल्या टाळेबंदीच्या काळात बक्षीस वितरण समारंभ आयोजित होऊ शकला नाही, त्यामुळे संस्थेच्या वतीने पोस्टाद्वारे विजेत्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र पाठविण्यात येऊन ऑनलाइन माध्यमातून पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला, आणि विजेत्यांना त्यांच्या माता-पित्यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले, तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. स्पर्धेच्या पारितोषिकासाठी स्मृतिचिन्ह युवक मित्र परिवाराचे अध्यक्ष श्री प्रवीण महाजन यांनी संस्थेला भेट केले. या स्पर्धेचे आयोजन के.वाय.के.एम फाऊंडेशनचे महाराष्ट्रातील सर्व विभागातील प्रत्येकी एक आयोजक मिळून करण्यात आले, त्यात आकाश कोल्हे (पुणे), प्राजक्ता माळी (उत्तर महाराष्ट्र), गायत्री साबळे (कोकण), दीपाली कांबळे (विदर्भ), प्रवीण आटोळे (मराठवाडा) यांचा सहभाग होता. तसेच पर्यवेक्षण तथा निरीक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, संस्थापक सदस्य जागृती मोगरे यांनी केले. अखिल भारतीय नाट्य परिषद व के.वाय.के.एम संस्थेचा वतीने मराठी रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात नाट्य परिषदेचे वतीने श्री चंद्रशेखर पाटील , डॉक्टर अभिनव दरवडे , श्री भटू चौधरी , श्री पारिजात चव्हाण , श्री प्रदीप गोपाळ , श्री राजू भावसार , श्री सचिन बागुल, के. वाय.के. एम महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री मोहनिष वाडेकर, सचिव श्री कल्पेश बोरसे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी रंगभूमी पूजन करण्यात आले त्यानंतर कलेचे दैवत श्री नटराज यांचे पूजन करण्यात आले . यावेळी तंगा मंगा ना दंगा या व्यावसायिक नाटका बद्दल बोलताना भटू चौधरी यांनी सांगितले की भारतात कदाचित पहिल अस हे नाटक आहे की कोरोना आणि लोकडाऊन मुळे या नाटकाची तालीम गेली 6 महिने गुगल मिट या अँप वर दररोज 3 तास होत असते खानदेशातील प्रसिद्ध इतिहासकार , तथा साहित्यिक श्री बापूसाहेब हटकर यांच्या लेखणीतून हे नाटक साकार झाले असून श्री मनोहर खैरनार हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत . जलरंग तापी संस्था ची ही निर्मिती आहे. खानदेशातील विविध गावातील कलाकार यात निवडण्यात आले असून गेली 6 महिने अविरत तालीम चालू आहे लवकरच हे नाटक रंगभूमीवर येईल असे देखील भटू चौधरी यांनी सांगितले . श्री चंद्रशेखर पाटील यांनी देखील सर्व कलाकार यांना संघटित होऊन कार्य करण्याचा मौलिक सल्ला दिला तसेच कलाकारांना माफक दरात सरावासाठी नाट्य मंदिर मिळवून देऊ असे आश्वासन दिले, श्री अभिनव दरवडे यांनी देखील नाटक व त्यात येणाऱ्या अडचणी याबाबत सविस्तर समयोचित मार्गदर्शन केले.खान्देशातील कलाकारांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी अथक परिश्रम याविषयी इतर मार्ग नाही असे सूतोवाचन अभिनेते प्रदीप गोपाळ यांनी केले, तसेच त्यांच्या वतीने खान्देशातून कलाकारांना मदतीचा हात देऊन पुढे आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले, या कार्यक्रमात तंगा मंगा ना दंगा या नाटकातील कलाकार श्री भटू चौधरी श्री कुणाल शिंदे श्री ध्यानेशवर शिंदे श्री भारत पवार व श्री अभिनव दरवडे श्री जादुगार चेतन उपाध्याय व दिग्दर्शक श्री प्रदीप गोपाळ यांचा अखिल भारतीय नाट्य परिषद व के.वाय.के.एम या संस्थेच्या वतीने स्मृती चिन्ह , प्रमाणपत्र , गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला महात्मा गांधी जयंती व अहिंसा दिनानिमित्त KYKM फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण व अहिंसेची शपथ.15/10/2020 धुळे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने व अहिंसा दिनाचे औचित्य साधून तरून पिढीला बापूंच्या अहिंसेची शिकवण मिळावी या हेतूने KYKM फाऊंडेशन,धुळे यांनी लळीग किल्ल्याच्या पायथ्याशी वृक्षारोपण करून अहिंसेची शपथ घेतली.
KYKM फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक तरुण एकत्रितपणे सामाजिक हिताचे कार्य करत असतात. तरूणांना अहिंसेची शिकवण मिळावी व अहिंसेच्या मार्गाने पुढील पिढी घडली पाहिजे या उद्देशाने फौंडेशनच्या वतीने धुळे येथील लळींग किल्ल्याच्या पायथ्याशी वृक्षारोपण करून अहिंसेचा मार्ग स्वीकारण्याची शपथ घेतली. तसेच "महात्मा pledge" या ऑनलाईन शपथ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, शपथ घेतल्यानंतर प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येत आहे.(visit : Kykm.weebly.com) यावेळी KYKM फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, या पदाधिकारी वर्गासोबत स्वयंसेवक आकाश पाटोळे, अनिल चौधरी, प्रेम वाकळे, निलेश कुलकर्णी, प्रतीक घटी आदी. उपस्थित होते. के.वाय.के.एम फाऊंडेशनचा द्वितीय वर्धापनदिन व जागतिक महिला दिन साजरा....! के.वाय.के.एम.फाऊंडेशन धुळे यांच्या विद्यमाने के.वाय.के.एम.फाऊंडेशनचा द्वितीय वर्धापनदिन व जागतिक महिला दिनानिमित्ताने 'खान्देश युवा वक्ता-२०२०" जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे विद्यावर्धिनी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले.दि.०७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. जितेंद्रजी सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती.शुभदा रावल-ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व महाविद्यालयात असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी महाविद्यालय नेहमीच संस्थेला सहकार्य करेल असे प्रतिपादन केले,तर जितेंद्र सोनवणे साहेबांनी अभंगाच्या ओळीने स्पर्धेस सुरुवात केली.या स्पर्धेसाठी धुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील १७ महाविद्यालयाना आमंत्रित करण्यात आले होते.या स्पर्धेतील पारितोषिक वितरण समारंभ दुपारी आयोजित करण्यात आला.सर्व सहभागी व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका श्रीमती.अल्पा अनुपजी अग्रवाल,नगरसेविका तथा माजी. स्थायी समिती सभापती श्रीमती.बालिबेन मांडोरे व माजी नगरसेविका श्रीमती.मायदेवी महादेव परदेशी उपस्थित होते.या स्पर्धेचे परीक्षण निःपक्षपाती श्री.योगेश्वर गोरक्षनाथ आव्हाळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी के.वाय.के.एम.फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, उपाध्यक्ष दिव्यांनी बोरसे, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव जागृती मोगरे, खजिनदार चेतन उपाध्याय ,सदस्य अश्विनी पाटील,मुकेश फलके तसेच सहकार्य ऋषिकेश सोनवणे, राहूल परदेशी व सद्गुरु गोरक्षनाथ महाराज बहुउद्देशीय संस्था रानमळा आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धेतील विजेते:-प्रथम क्रमांक सारांश धनंजय सोनार(डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल कॉलेज, धुळे),द्वितीय क्रमांक हर्षदा किरण शेलार(आयटीआय कॉलेज, धुळे),तृतीय क्रमांक प्रफुल्ल तोतराम माळी(आयटीआय कॉलेज, धुळे),उत्तेजनार्थ:-१)धर्मेश साहेबराव हिरे(विद्यावर्धिनी महाविद्यालय,धुळे),२)श्वेता चंद्रकांत जैन,(विद्यावर्धिनी महाविद्यालय,धुळे)३) योगेश महेश महाले(मा.ध.पालेशा वाणिज्य कॉलेज, धुळे)
|
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |