Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
धुळे : दिवाळी सणाच्या दिवशी देखील सीमेवर देश संरक्षणासाठी सज्ज असलेल्या भारतीय जवानांच्या कार्याला सलामी देण्यासाठी आणि देशासाठी सेवा बजावतांना शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून के.वाय.के.एम फाऊंडेशन,धुळे तर्फे दीपावलीच्या शुभ दिनी धुळे शहरातील शिवतीर्थ चौकातील शहीद अब्दुल हमीद अन्सारी यांच्या स्मरकाभोवती दीपप्रज्वलन करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते प्रथम दीप प्रज्वलित करून दीपप्रज्वलनाला सुरुवात केली, त्यांतर शहीद स्मारक, शिवतीर्थ आणि रणगाड्याभोवती दीप प्रज्वलित करण्यात आले, तसेच दिव्यांनी भारताचा नकाशा करून एक दिवा शहिदांसाठी संकल्पना दाखविण्यात आली. रस्त्यावरील नागरिकांनी दीपप्रज्वलन करून तर काहींनी दीपदान करून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे आयोजन के.वाय.के.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, संस्थापक सदस्य मुकेश फलके आणि जागृती मोगरे यांनी केले, तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिव्या सावळे, ज्ञानेश्वरी बिडवे, भाग्यश्री भावसार, प्रियंका पाटील, हेमराज, समाजसेवक श्री.रवींद्र पवार आणि भारतीय सैन्य दलातील जवान श्री.भूषण पाटील यांनी परिश्रम घेतले.
0 Comments
Leave a Reply. |
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |