Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
नेहरू युवा केंद्र,धुळे आणि के.वाय.के.एम फाऊंडेशनतर्फे कोरोना नियमानुसार स्पर्धा आयोजित. धुळे : भारत सरकार युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र, धुळे आणि के.वाय.के.एम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लॉकडाऊन नंतरचा पहिला "धुळे युवा महोत्सव" सांस्कृतिक स्पर्धा-२०२१ चे आयोजन करण्यात आले. कोरोना नियमांचे पालन व्हावे या उद्देशाने दिनांक १७ डिसेंबर ते २६ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन नोंदणी करून स्पर्धकांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली तर २७ डिसेंबर रोजी धुळे जिल्ह्यातील एस.एस.व्ही.पी.एस.कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या ओडिटोरियम हॉल येथे लॉकडाऊन नंतरचा पहिला "धुळे युवा महोत्सव" सांस्कृतिक स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत नृत्य, नाट्य, गायन या कलाप्रकारात जिल्ह्यातील सर्व स्तरातील युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व्यवस्थापन समिती सदस्य श्री. मोहन पावरा सर आणि सिनेट सदस्य श्री.विलासजी चव्हाण सर तर अध्यक्ष स्थानी श्री. शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.मनोहर पाटील सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नेहरू युवा केंद्र, धुळे जिल्हा युवा कार्यक्रम अधिकारी श्री. अशोक कुमार मेघवाल यांनी केले. दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आणि स्पर्धेला सुरुवात झाली. यात भारतीय संस्कृतीच्या अनेक प्राचीन व आधुनिक कलेच्या भरतनाट्यम, हिपहॉप, लावणी, गीतगायन, मिमिक्री, एकपात्री नाट्य, रॅप, इत्यादी प्रकारात स्पर्धकांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. स्पर्धेचे परीक्षण श्री.मुकेश तायडे, सौ.रत्ना वाघ आणि श्री.सदाशिव सूर्यवंशी यांनी केले. स्पर्धेतील सादरीकरणानंतर स्पर्धकांना अल्पोपहार देण्यात आला आणि त्यानंतर बक्षीस वितरण करण्यात आले. नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक युग बागुल, द्वितीय आंचल निकम, तृतीय शेखर शिंदे, उत्तेजनार्थ मयूर मनोरे, नाट्य स्पर्धेत प्रथम हर्षदा शेलार, द्वितीय कल्याणी क्षीरसागर, उत्तेजनार्थ कावेरी राजपूत, तर गायन स्पर्धेत प्रथम ललित पाटील, द्वितीय रेखा पाटील, तृतीय रुपाली बोरसे, उत्तेजनार्थ जयेश सूर्यवंशी यांनी पटकावला.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी के.वाय.के.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिश वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, मार्गदर्शक निलेश तेलंग, स्वयंसेवक अश्वघोष पवार, हेमराज पाटील, दिव्या सावळे, ज्ञानेश्वरी बिडवे, कल्याणी मोरे, प्रियंका विसपुते, साक्षी जाधव, दिव्या गवळी, हर्षदा जाधव, मानसी शिसोदे, गौतमी कुलकर्णी,भाग्यश्री भावसार, संजना सरख, एस.एस.व्ही.पी.एस कला व वाणिज्य महाविद्यालयचे श्री.निलेश पाटील, नेहरू युवा केंद्राचे ललित पाटील यांनी परिश्रम घेतले.
0 Comments
धुळे : जगावर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या जागतिक महामारी असलेल्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव सध्या स्थितीत जरी कमी झाला असला तरी देखील तो संसर्गजन्य विषाणू असल्या कारणाने त्यास आळा घालण्यासाठी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र धुळे जिल्हा आणि के.वाय.के.एम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "कोरोना जनजागृती मोहीम" अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान नेहरू युवा केंद्राचे धुळे जिल्हा युवा कार्यक्रम अधिकारी अशोककुमार मेघवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या अभियानाचा दुसरा टप्पा जुने धुळे येथील सुपडू आप्पा कॉलनीतील सावता माळी शाळेजवळ पार पडला. यात संस्थापक सहसचिव चेतन उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली मास्क वापरण्याचे महत्व पटवून देण्यात आले तसेच, योग्य मास्क वापरावयाची पध्दत शिकविण्यात आली. त्याचबरोबर स्वयंसेविका ज्ञानेश्वरी बिडवे यांनी साबण वाटप करून कशाप्रकारे ३० सेकंड हात स्वच्छ धुवायला हवेत याचे प्रात्यक्षिक करवून घेतले. तर स्वयंसेविका दिव्या साळवे यांनी सॅनिटायझरचे वाटप करून सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी नियमितपणे नियम पालन करण्याची शपथ दिली. यावेळी महिला, पुरुष आणि बाल वर्ग उपस्थित होते. माझ्या परिवाराचे संरक्षण माझी जबादारी असल्याने मी कोरोना रोखण्यासाठी प्रामाणिकपणे नियमांचे पालन करून कोरोनाला पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन नागरिकांतर्फे देण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनिश वाडेकर,संस्थापक सचिव कल्पेश बोरसे,संस्थापक सहसचिव चेतन उपाध्याय, संस्थापक सदस्य जागृती मोगरे तसेच स्वयंसेवक दिव्या साळवे, कल्याणी मोरे, ज्ञानेश्वरी बिडवे, साक्षी जाधव, राखी बडगुजर, प्रियंका विसपुते, भाग्यश्री भावसार, गौतमी कुलकर्णी, प्रियंका राजपूत, स्नेहा बडगुजर, हर्षदा बडगुजर, दिव्या गवळी, देवयानी वाघ, अविनाश पाटील, तुषार देसले, प्रसाद महाले, लवेश मोरे, निलेश तेलंन, अश्वघोष पवार, गणेश शेजुळ , गोपाल बडगुजर, सुकदेव बडगुजर आदी उपस्थित होते. |
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |