Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
धुळे (नगाव) : के.वाय.के.एम फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक सहसचिव चेतन उपाध्याय यांच्या मातोश्री सौ. ललिता उपाध्याय (पारीख) यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने नागाव येथील आनंद विहार वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्तींसाठी प्रसिद्ध जादूगार चेतनकुमार यांचे अदभूत अविश्वसनीय जादूचे प्रयोग सादर करून जन्मदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सर्व वृद्धांना भेटून ललिता उपाध्याय (पारीख) यांनी तब्येतीची विचारणा करून आशीर्वाद घेतले. तदनंतर सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून सर्वांनी त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या, यानंतर चेतनकुमार यांनी जादूचे प्रयोग दाखवून कार्यक्रम सादर केला. येथील वृद्धाश्रमात ३० वर्षांपासून अनेक वृद्ध आजी-आजोबांनी सहारा घेतला आणि कालांतराने त्यांना त्यांच्या परिवाराने पुन्हा आपलेसे केले. मात्र एवढ्या वर्षात अश्या प्रकारे आईचा जन्मदिवस साजरा करण्याची संकल्पना कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आनंद विहार येथील अध्यक्ष नानासो शशिकांत भदाणे यांनी केले. तसेच भविष्यात के.वाय.के.एम तर्फे प्रकल्प "आधार" च्या माध्यमातून या सर्व वृद्धांना आधार देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे असे आश्वासन के.वाय.के.एम फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य सचिव कल्पेश बोरसे यांनी दिले. यावेळी के.वाय.के.एम चे सहसचिव चेतन उपाध्याय, आनंद विहार च्या मुख्याध्यापिका शीतल पाटील, उपस्थित होते, कार्यक्रमासाठी शिक्षिका भारती सोनवणे, आशा शिंदे, मंगला वाघ, नंदकिशोर निकम, निलेश जाधव यांनी सहकार्य केले.
के वाय के एम च्या औरंगाबाद विभागातर्फे नागरिकत्व, कायदा, संविधान, कार्य आणि कर्तव्ये व पर्यावरण20/10/2021
औरंगाबाद : श्री स्वामी समर्थ केंद्र येथे के वाय के एम फाऊंडेशन मराठवाडा प्रमुख यांनी प्रकल्प "सक्षम" च्या माध्यमातून वृद्ध आणि लहान मुलांना मार्गदर्शन केले, यात के वाय के एम तर्फे घेण्यात येणाऱ्या निबंध स्पर्धेची माहिती देण्यात आली व त्याच बरोबर नागरिकत्व, कायदा, संविधान कार्य आणि कर्तव्ये व पर्यावरण संवर्धन याविषयी माहिती दिली.
के.वाय.के.एम फाऊंडेशन आणि सद्गुरु सेवा प्रतिष्ठान तर्फे अप्पर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रदीप पवार, नेहरू युवा केंद्र धुळे जिल्हा अधिकारी श्री.अशोक कुमार मेघवाल यांच्या हस्ते दूध वाटप धुळे : कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने धुळे जिल्ह्यातील रस्त्यावर राहणाऱ्या, निराधार, अनाथ, लोकांना के.वाय.के.एम फाऊंडेशन, धुळे आणि सदगुरु सेवा प्रतिष्ठाण, वारजे,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने "दूध-तुमच्यासाठी पण..!" या कार्यक्रमाद्वारे मसाला दूध वाटप करण्यात आले. वाटपाची सुरुवात धुळे जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते पांझरा नदीकाठच्या मस्जिद जवळील गरीब लोकांना मसाला दूध वाटून करण्यात आली, यावेळी त्यांनी लोकांना परिस्थिती बाबत विचारणा केली, त्यांची कारणे जाणून घेतली. तसेच धुळे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रदीप पवार आणि यांच्या हस्ते एकविरा देवी मंदिर परिसरात वाटप करण्यात आले, या उपक्रमात पवार साहेब स्वतःहून संस्थेच्या स्वयंसेवकांचे मनोबल वाढविण्यासाठी सोबत होते. त्यानंतर सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे नेहरू युवा केंद्राचे धुळे जिल्हा अधिकारी श्री.अशोक कुमार मेघवाल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, तसेच या कार्यक्रमासाठी मिशन क्लीन इंडिया अंतर्गत दूध वाटपानंतर कचरा संकलन करण्यासाठी वेस्टज बॅग देखील त्यांनी उपलब्ध करून दिल्या. सदरील कार्यक्रमासाठी सद्गुरू सेवा प्रतिष्ठान, वारजे, पुणे या संस्थेचे अध्यक्ष श्री.सचिन म्हसे यांनी दूध आणि इतर साहित्य उपलब्ध करून दिले.तसेच युवकमित्र परिवाराचे संस्थापक श्री.प्रवीण महाजन यांनी देखील धावती भेट देऊन उपक्रमाबाबत माहिती घेतली आणि स्वयंसेवकांचे कौतुक केले.
यावेळी के.वाय.के.एम फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, संस्थापक सदस्य जागृती मोगरे, स्वयंसेवक अश्वघोष पवार, नेहरू युवा केंद्र धुळे कर्मचारी ललित पाटील उपस्थित होते, उपक्रमासाठी आचारी गोपाल महाराज आणि मयूर चौधरी यांनी विनाशुल्क मदत केली. वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळेत न जाणाऱ्या आदिवासी मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य आणि शिक्षण...!15/10/2021
के.वाय.के.एम फाऊंडेशन आणि सदगुरु सेवा प्रतिष्ठान, वारजे, पुणे यांचा संयुक्त उपक्रम धुळे : वाचन प्रेरणा दिनानिमित्त अवधान येथे के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या प्रकल्प "शिक्षा" चे प्राथमिक उद्घाटन करण्यात आले, तसेच त्याअंतर्गत के.वाय.के.एम फाऊंडेशन, धुळे आणि सदगुरु सेवा प्रतिष्ठान, वारजे, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी वस्तीतील शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नवदुर्गा रूपाने कार्यक्रमात उपस्थित महिलांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यासाठी सदगुरु सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री.सचिन नामदेव म्हसे यांनी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. आदिवासी वस्तीत परराज्यातील स्थलांतरित तसेच अशिक्षित लोकांची संख्या जास्त असून आई-वडिलांना शिक्षणाचा देखील अभाव आहे, आणि यामुळे त्यांच्या पाल्यांचे भविष्य अंधारात जात आहे, मात्र त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रकल्प "शिक्षा" कार्यरत असणार आहे असे प्रस्ताविक के.वाय.के.एम महाराष्ट्र चे सचिव कल्पेश बोरसे यांनी केले. तर येत्या काळात संपूर्ण विद्यार्थ्यांना इतर शैक्षणिक साहित्य देखील उपलब्ध करून शिक्षणाची गोडी लावून शाळेत प्रवेश करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन संस्थेचे सहसचिव चेतन उपाध्याय यांनी केले. प्रकल्प "शिक्षा" च्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांना स्वयंसेविका दिव्या साळवे या विनाशुल्क रोज शिक्षणाचे धडे देणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.वाय.के.एमचे धुळे जिल्हाध्यक्ष प्रसाद महाले यांनी केले, तर कार्यक्रमाचे आयोजन योगिता साळवे,लताबाई वाघ, मोहिनी समाधान पाटील, सविता गोपाल बिल, वैशाली वाघ, पुनम पाटील,ज्योती कोळी, दिव्या साळवे या स्थानिक रहिवासींनी केले.
प्रकल्प "आधार" अंतर्गत प्रत्येक महिन्यालापॅड वाटप करण्याचा संकल्प..! धुळे : आदिवासी पाड्यावरील स्त्रियांना प्रत्येक महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या वेळी महागडे सॅनिटरी पॅड विकत घेणे परवडत नसल्याने अस्वच्छ कापड वापरून आजाराच्या आहारी जावे लागते. या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या प्रकल्प "सक्षम" अंतर्गत खुशीयांन फाऊंडेशनच्या साहाय्याने अवधान येथील वानरदेव वस्ती आणि एकलव्य नगर येथील आदिवासी पाड्यावर सॅनिटरी पॅड वाटण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी खुशीयांन फाऊंडेशनचे संस्थापक चिनू क्वात्रा आणि प्रकल्प समन्वयक तसेच के.वाय.के.एम चे महाराष्ट्र व्यवस्थापन समिती सदस्य वैभव गायकवाड यांच्या वतीने सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यात आले, विशेष म्हणजे हे पॅड स्वतः वैभव गायकवाड यांनी घरी तयार केलेले असून इको फ्रेंडली आणि पुनःवापरता येण्यायोग्य आहेत. या नवरात्री निमित्ताने ४०० पॅड वाटप करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे.
तसेच प्रकल्प "सक्षम" च्या माध्यमातून मासिक पाळीच्या वेळी कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत दिव्या सावळे यांनी समुपदेशन केले. तर येत्या काळात प्रत्येक महिन्यात १०० महिलांना पॅड देण्याचा उद्देश के.वाय.के.एम तर्फे ठेवण्यात आला आहे असे प्रतिपादन रीना पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी के.वाय.के.एम फाऊंडेशनचे संस्थापक सहसचिव चेतन उपाध्याय आणि धुळे जिल्हाध्यक्ष प्रसाद महाले हे उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे नियोजन के.वाय.के.एम च्या स्वयंसेविका दिव्या सावळे आणि रीना पाटील यांनी केले. |
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |