Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
धुळे (नगाव) : के.वाय.के.एम फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक सहसचिव चेतन उपाध्याय यांच्या मातोश्री सौ. ललिता उपाध्याय (पारीख) यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने नागाव येथील आनंद विहार वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्तींसाठी प्रसिद्ध जादूगार चेतनकुमार यांचे अदभूत अविश्वसनीय जादूचे प्रयोग सादर करून जन्मदिवस साजरा करण्यात आला. यावेळी सर्व वृद्धांना भेटून ललिता उपाध्याय (पारीख) यांनी तब्येतीची विचारणा करून आशीर्वाद घेतले. तदनंतर सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून सर्वांनी त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या, यानंतर चेतनकुमार यांनी जादूचे प्रयोग दाखवून कार्यक्रम सादर केला. येथील वृद्धाश्रमात ३० वर्षांपासून अनेक वृद्ध आजी-आजोबांनी सहारा घेतला आणि कालांतराने त्यांना त्यांच्या परिवाराने पुन्हा आपलेसे केले. मात्र एवढ्या वर्षात अश्या प्रकारे आईचा जन्मदिवस साजरा करण्याची संकल्पना कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन आनंद विहार येथील अध्यक्ष नानासो शशिकांत भदाणे यांनी केले. तसेच भविष्यात के.वाय.के.एम तर्फे प्रकल्प "आधार" च्या माध्यमातून या सर्व वृद्धांना आधार देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे असे आश्वासन के.वाय.के.एम फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य सचिव कल्पेश बोरसे यांनी दिले. यावेळी के.वाय.के.एम चे सहसचिव चेतन उपाध्याय, आनंद विहार च्या मुख्याध्यापिका शीतल पाटील, उपस्थित होते, कार्यक्रमासाठी शिक्षिका भारती सोनवणे, आशा शिंदे, मंगला वाघ, नंदकिशोर निकम, निलेश जाधव यांनी सहकार्य केले.
Comments are closed.
|
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |