Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
धुळे : तळागाळातील युवकांचा भाषण कौशल्याने विकास व्हावा आणि भावी पिढीला वक्तृत्वाचा छंद लागावा या उद्देशाने के.वाय.के.एम फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित "महाराष्ट्र शब्दरंग करंडक-२०२२" वक्तृत्व स्पर्धेचे दुसरे पर्व धुळ्यात पार पडले. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातील युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला, स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रदीपजी पवार यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षेत वक्तृत्वाचे महत्व अधोरेखित केले तर स्वच्छता आणि वक्तृत्व याबाबत मार्गदर्शन केले, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्रजी सोनवणे यांनी वक्तृत्वाचे प्राचीन काळापासून असलेले नाते आणि आजची परिस्थिती यावर मत व्यक्त केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजसेवक श्री.अमोल (बंटी) मासुळे यांनी एका वक्त्याने भविष्यातील इतर पाच वक्ते घडवावे असे प्रतिपादन केले. स्पर्धेच्या मध्यांतरांतर भोजनाची व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात आली होती, बक्षीस समारंभ कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी श्री.अशोककुमार मेघवाल उपस्थित होते, यावेळी एका भाषणाने युद्ध होऊ शकते, तर एका भाषणाने युद्ध थांबू देखील शकते असे मत त्यांनी मांडले. परीक्षक म्हणून एस.जी.एम.सी.टी संस्थेचे अध्यक्ष श्री.योगेश्वर आव्हाळे यांनी पारदर्शक पद्धतीने गुणदान करून योग्य निकाल दिला, तर वक्त्यांच्या त्रुटी दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचनाचा सल्ला देखील सांगितला. के.वाय.के.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.मोहनिश वाडेकर यांनी स्वानुभव सांगून हरलेल्या वक्त्याने इतरांना वक्ता बनविण्यासाठी प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रफुल्ल माळी, द्वितीय संकेत पाटील, तृतीय दर्शना राजपूत, उत्तेजनार्थ प्रसाद जगताप आणि निर्मिती वैद्य, श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा वक्ता रोहीत ठाकूर, तर शब्दरंग विशेष हर्षदा पाटील यांनी पारितोषिके पटकविले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयोजन अध्यक्ष कल्पेश बोरसे, खजिनदार चेतन उपाध्याय, संचालक सदस्य निलेश तेलंग, सूत्रसंचालन प्रसाद महाले, स्नेहा बडगुजर, दिव्या सावळे, ज्ञानेश्वरी बिडवे, हर्षदा बडगुजर, भाग्यश्री भावसार, प्रियंका विसपुते, मानसी शिसोदे, अश्वघोष पवार, प्राजक्ता अहिरराव, मुकेश फलके, जागृती मोगरे यांनी मेहनत घेतली.
0 Comments
|
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |