Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
#साबण आणि #मास्क वाटून नियमित वापरण्याची #शपथ
धुळे : जागतिक महामारी असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी संसर्गजन्य विषाणू असल्याने पुन्हा सक्रिय होऊ शकतो या परिणामाचे पूर्वनियोजन करण्यासाठी भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रिडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र धुळे जिल्हा आणि के.वाय.के.एम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "कोरोना जनजागृती मोहीम" अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान नेहरू युवा केंद्राचे धुळे जिल्हा युवा कार्यक्रम अधिकारी अशोककुमार मेघवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या अभियानाचा प्रथम टप्पा चाळीसगाव रोड परिसरातील, पश्चिम हुडको भागात पार पडला, यात साबण वाटप करून कशाप्रकारे ३० सेकंड हात धुवायला हवे याची पध्दत शिकविण्यात आली, तसेच मास्क वाटप करून नियमितपणे मास्कचा वापर करण्याची शपथ देण्यात आली. यावेळी येत्या काळात कोरोना प्रादुर्भावा पासून संरक्षण म्हणून हात धुणे, मास्कचा नियमित वापर करणे, आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवणे हेच आपले कवच आहे असे मार्गदर्शन के.वाय.के.एम चे सचिव कल्पेश बोरसे यांच्या कडून करण्यात आले. यावेळी के.वाय.के.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिश वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, कल्याणी मोरे, दिव्या सावळे, ज्ञानेश्वरी बिडवे, साक्षी जाधव, राखी बडगुजर, प्रियंका विसपुते, भाग्यश्री भावसार, गौतमी कुलकर्णी, गणेश शेजुळ, ललिता पारीख उपस्थित होते.
0 Comments
धुळे : "एक हात मदतीचा" या संकल्पनेतून के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या प्रकल्प "आधार" अंतर्गत नगाव गावाजवळील स्थलांतरित आदीवासी वस्तीत वापरायोग्य कपडे व साड्यांचे वाटप करण्यात आले. यासाठी सदगुरु सेवा प्रतिष्ठान, वारजे चे संस्थापक सचिन म्हसे यांच्या वतीने पुण्यात तर के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या स्वयंसेवका दिव्या, ज्ञानेश्वरी, कल्याणी, राखी, स्नेहा, प्रियंका, गौतमी, साक्षी,भाग्यश्री आदींनी धुळे जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे कपड्यांचे संकलन केले. तसेच येत्या काळात या वस्तीतील लोकांना आरोग्य तपासणी बाबत शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. यावेळी के.वाय.के.एम.फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिश वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, दिव्या सावळे, ज्ञानेश्वरी बिडवे, प्रियंका विसपुते, स्नेहा बडगुजर, साक्षी बडगुजर, राखी बडगुजर,साक्षी जाधव, हर्षदा जाधव, गौतमी कुलकर्णी, दिव्या बिर्हाडे, विजयंता बिर्हाडे, कल्याणी मोरे, गणेश शेजुळ, अश्वघोष पवार, प्रसाद महाले, लवेश, निलेश, रवीद्र चौधरी आदी उपस्थित होते. के.वाय.के.एम फाऊंडेशन तर्फे जादूचे प्रयोग सादरीकरण करून एस.टी कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविले.18/11/2021 धुळे : सध्या महाराष्ट्रात एस.टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, या संपला अनेक माध्यमातून पाठिंबा मिळत आहे, त्यानुसार धुळे जिल्ह्यातील एस.टी डेपो येथे सुरू असलेल्या संपाला रोज सर्व कर्मचारी उपस्थित राहतात, त्यांना सकारात्मक ऊर्जा मिळावी आणि मनोबल वाढावे या उद्देशाने के.वाय.के.एम फाऊंडेशन, धुळे तर्फे प्रकल्प "आनंद" अंतर्गत सुप्रसिद्ध युवा जादूगार चेतनकुमार यांचे अदभूत अविश्वसनीय जादूचे प्रयोग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदरील कार्यक्रमात के.वाय.के.एम फाऊंडेशनचे सचिव कल्पेश बोरसे यांनी सहानुभूती पूर्वक कर्मचाऱ्यांचा आणि त्यांच्या परिवाराचा विचार करून लवकरच संपावर तोडगा निघेल आणि पुन्हा लालपरी धावेल अशी अपेक्षा व्यक्त केली, तद्नंतर जादूगार चेतनकुमार यांनी जादूच्या माध्यमातून ३८ एस.टी. कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, आणि सर्वांचे मनोरंजन केले. कामगार संघटनेचे रुपेंद्र तायडे व इतर पदाधिकारी यांनी या कार्यक्रमाद्वारे संपाला बळ मिळाले आणि मनोबल वाढले यासाठी आभार व्यक्त केले.
यावेळी के.वाय.के.एम फाऊंडेशनचे सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, स्वयंसेवक दिव्या सावळे, ज्ञानेश्वरी बिडवे, प्रियंका विसपुते, स्नेहा बडगुजर, प्रियंका विसपुते, भाग्यश्री भावसार, कल्याणी मोरे आदी उपस्थित होते. धुळे : आदिवासी पाड्यावरील स्त्रियांना प्रत्येक महिन्याला येणाऱ्या मासिक पाळीच्या वेळी महागडे सॅनिटरी पॅड विकत घेणे परवडत नसल्याने अस्वच्छ कापड वापरून आजाराच्या आहारी जावे लागते. याबाबत महिलांना सॅनिटरी पॅड वापराबाबत सक्षम करण्यासाठी के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या प्रकल्प "सक्षम" अंतर्गत खुशीयांन फाऊंडेशनच्या साहाय्याने अवधान येथील वानरदेव वस्ती आणि एकलव्य नगर येथील आदिवासी पाड्यावर सॅनिटरी पॅड वाटण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा हा दुसरा महिना होता, या उपक्रमासाठी खुशीयांन फाऊंडेशनचे संस्थापक चिनू क्वात्रा आणि प्रकल्प समन्वयक तसेच के.वाय.के.एम चे महाराष्ट्र व्यवस्थापन समिती सदस्य वैभव गायकवाड यांच्या वतीने सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देण्यात आले, तसेच हे पॅड पुनःवापरता येण्यायोग्य आहेत.
तसेच प्रकल्प "सक्षम" च्या माध्यमातून मासिक पाळीच्या वेळी कशाप्रकारे काळजी घ्यावी याबाबत दिव्या सावळे यांनी समुपदेशन केले. या कार्यक्रमासाठी के.वाय.के.एम फाउंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर आणि सहसचिव चेतन उपाध्याय हे उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे नियोजन के.वाय.के.एम च्या स्वयंसेविका ज्ञानेश्वरी बिडवे, भाग्यश्री भावसार, प्रियंका विसपुते, गौतमी कुलकर्णी, अविनाश पाटील, गणेश शेजुळ यांनी केले. Highlights 👇🏻👇🏻 https://youtu.be/Y1ZwvBYzIBQ धुळे : दिवाळी सणाच्या दिवशी देखील सीमेवर देश संरक्षणासाठी सज्ज असलेल्या भारतीय जवानांच्या कार्याला सलामी देण्यासाठी आणि देशासाठी सेवा बजावतांना शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून के.वाय.के.एम फाऊंडेशन,धुळे तर्फे दीपावलीच्या शुभ दिनी धुळे शहरातील शिवतीर्थ चौकातील शहीद अब्दुल हमीद अन्सारी यांच्या स्मरकाभोवती दीपप्रज्वलन करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते प्रथम दीप प्रज्वलित करून दीपप्रज्वलनाला सुरुवात केली, त्यांतर शहीद स्मारक, शिवतीर्थ आणि रणगाड्याभोवती दीप प्रज्वलित करण्यात आले, तसेच दिव्यांनी भारताचा नकाशा करून एक दिवा शहिदांसाठी संकल्पना दाखविण्यात आली. रस्त्यावरील नागरिकांनी दीपप्रज्वलन करून तर काहींनी दीपदान करून उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे आयोजन के.वाय.के.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, संस्थापक सदस्य मुकेश फलके आणि जागृती मोगरे यांनी केले, तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिव्या सावळे, ज्ञानेश्वरी बिडवे, भाग्यश्री भावसार, प्रियंका पाटील, हेमराज, समाजसेवक श्री.रवींद्र पवार आणि भारतीय सैन्य दलातील जवान श्री.भूषण पाटील यांनी परिश्रम घेतले. |
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |