Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
धुळे : "एक हात मदतीचा" या संकल्पनेतून के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या प्रकल्प "आधार" अंतर्गत नगाव गावाजवळील स्थलांतरित आदीवासी वस्तीत वापरायोग्य कपडे व साड्यांचे वाटप करण्यात आले. यासाठी सदगुरु सेवा प्रतिष्ठान, वारजे चे संस्थापक सचिन म्हसे यांच्या वतीने पुण्यात तर के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या स्वयंसेवका दिव्या, ज्ञानेश्वरी, कल्याणी, राखी, स्नेहा, प्रियंका, गौतमी, साक्षी,भाग्यश्री आदींनी धुळे जिल्ह्यात उत्स्फूर्तपणे कपड्यांचे संकलन केले. तसेच येत्या काळात या वस्तीतील लोकांना आरोग्य तपासणी बाबत शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. यावेळी के.वाय.के.एम.फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिश वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, दिव्या सावळे, ज्ञानेश्वरी बिडवे, प्रियंका विसपुते, स्नेहा बडगुजर, साक्षी बडगुजर, राखी बडगुजर,साक्षी जाधव, हर्षदा जाधव, गौतमी कुलकर्णी, दिव्या बिर्हाडे, विजयंता बिर्हाडे, कल्याणी मोरे, गणेश शेजुळ, अश्वघोष पवार, प्रसाद महाले, लवेश, निलेश, रवीद्र चौधरी आदी उपस्थित होते.
0 Comments
Leave a Reply. |
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |