Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
वाचन प्रेरणा दिनानिमित्त शाळेत न जाणाऱ्या आदिवासी मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य आणि शिक्षण...!15/10/2021
के.वाय.के.एम फाऊंडेशन आणि सदगुरु सेवा प्रतिष्ठान, वारजे, पुणे यांचा संयुक्त उपक्रम धुळे : वाचन प्रेरणा दिनानिमित्त अवधान येथे के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या प्रकल्प "शिक्षा" चे प्राथमिक उद्घाटन करण्यात आले, तसेच त्याअंतर्गत के.वाय.के.एम फाऊंडेशन, धुळे आणि सदगुरु सेवा प्रतिष्ठान, वारजे, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी वस्तीतील शाळेत न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नवदुर्गा रूपाने कार्यक्रमात उपस्थित महिलांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यासाठी सदगुरु सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक श्री.सचिन नामदेव म्हसे यांनी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. आदिवासी वस्तीत परराज्यातील स्थलांतरित तसेच अशिक्षित लोकांची संख्या जास्त असून आई-वडिलांना शिक्षणाचा देखील अभाव आहे, आणि यामुळे त्यांच्या पाल्यांचे भविष्य अंधारात जात आहे, मात्र त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रकल्प "शिक्षा" कार्यरत असणार आहे असे प्रस्ताविक के.वाय.के.एम महाराष्ट्र चे सचिव कल्पेश बोरसे यांनी केले. तर येत्या काळात संपूर्ण विद्यार्थ्यांना इतर शैक्षणिक साहित्य देखील उपलब्ध करून शिक्षणाची गोडी लावून शाळेत प्रवेश करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन संस्थेचे सहसचिव चेतन उपाध्याय यांनी केले. प्रकल्प "शिक्षा" च्या माध्यमातून या सर्व विद्यार्थ्यांना स्वयंसेविका दिव्या साळवे या विनाशुल्क रोज शिक्षणाचे धडे देणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.वाय.के.एमचे धुळे जिल्हाध्यक्ष प्रसाद महाले यांनी केले, तर कार्यक्रमाचे आयोजन योगिता साळवे,लताबाई वाघ, मोहिनी समाधान पाटील, सविता गोपाल बिल, वैशाली वाघ, पुनम पाटील,ज्योती कोळी, दिव्या साळवे या स्थानिक रहिवासींनी केले.
Comments are closed.
|
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |