Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
के.वाय.के.एम फाऊंडेशन आणि सद्गुरु सेवा प्रतिष्ठान तर्फे अप्पर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत बच्छाव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रदीप पवार, नेहरू युवा केंद्र धुळे जिल्हा अधिकारी श्री.अशोक कुमार मेघवाल यांच्या हस्ते दूध वाटप धुळे : कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने धुळे जिल्ह्यातील रस्त्यावर राहणाऱ्या, निराधार, अनाथ, लोकांना के.वाय.के.एम फाऊंडेशन, धुळे आणि सदगुरु सेवा प्रतिष्ठाण, वारजे,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने "दूध-तुमच्यासाठी पण..!" या कार्यक्रमाद्वारे मसाला दूध वाटप करण्यात आले. वाटपाची सुरुवात धुळे जिल्हा अप्पर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत बच्छाव यांच्या हस्ते पांझरा नदीकाठच्या मस्जिद जवळील गरीब लोकांना मसाला दूध वाटून करण्यात आली, यावेळी त्यांनी लोकांना परिस्थिती बाबत विचारणा केली, त्यांची कारणे जाणून घेतली. तसेच धुळे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रदीप पवार आणि यांच्या हस्ते एकविरा देवी मंदिर परिसरात वाटप करण्यात आले, या उपक्रमात पवार साहेब स्वतःहून संस्थेच्या स्वयंसेवकांचे मनोबल वाढविण्यासाठी सोबत होते. त्यानंतर सिद्धिविनायक गणपती मंदिर येथे नेहरू युवा केंद्राचे धुळे जिल्हा अधिकारी श्री.अशोक कुमार मेघवाल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले, तसेच या कार्यक्रमासाठी मिशन क्लीन इंडिया अंतर्गत दूध वाटपानंतर कचरा संकलन करण्यासाठी वेस्टज बॅग देखील त्यांनी उपलब्ध करून दिल्या. सदरील कार्यक्रमासाठी सद्गुरू सेवा प्रतिष्ठान, वारजे, पुणे या संस्थेचे अध्यक्ष श्री.सचिन म्हसे यांनी दूध आणि इतर साहित्य उपलब्ध करून दिले.तसेच युवकमित्र परिवाराचे संस्थापक श्री.प्रवीण महाजन यांनी देखील धावती भेट देऊन उपक्रमाबाबत माहिती घेतली आणि स्वयंसेवकांचे कौतुक केले.
यावेळी के.वाय.के.एम फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, संस्थापक सदस्य जागृती मोगरे, स्वयंसेवक अश्वघोष पवार, नेहरू युवा केंद्र धुळे कर्मचारी ललित पाटील उपस्थित होते, उपक्रमासाठी आचारी गोपाल महाराज आणि मयूर चौधरी यांनी विनाशुल्क मदत केली. Comments are closed.
|
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |