Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
के.वाय.के.एम फाऊंडेशनचा द्वितीय वर्धापनदिन व जागतिक महिला दिन साजरा....! के.वाय.के.एम.फाऊंडेशन धुळे यांच्या विद्यमाने के.वाय.के.एम.फाऊंडेशनचा द्वितीय वर्धापनदिन व जागतिक महिला दिनानिमित्ताने 'खान्देश युवा वक्ता-२०२०" जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे विद्यावर्धिनी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले.दि.०७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री. जितेंद्रजी सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती.शुभदा रावल-ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व महाविद्यालयात असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी महाविद्यालय नेहमीच संस्थेला सहकार्य करेल असे प्रतिपादन केले,तर जितेंद्र सोनवणे साहेबांनी अभंगाच्या ओळीने स्पर्धेस सुरुवात केली.या स्पर्धेसाठी धुळे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील १७ महाविद्यालयाना आमंत्रित करण्यात आले होते.या स्पर्धेतील पारितोषिक वितरण समारंभ दुपारी आयोजित करण्यात आला.सर्व सहभागी व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून समाजसेविका श्रीमती.अल्पा अनुपजी अग्रवाल,नगरसेविका तथा माजी. स्थायी समिती सभापती श्रीमती.बालिबेन मांडोरे व माजी नगरसेविका श्रीमती.मायदेवी महादेव परदेशी उपस्थित होते.या स्पर्धेचे परीक्षण निःपक्षपाती श्री.योगेश्वर गोरक्षनाथ आव्हाळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी के.वाय.के.एम.फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, उपाध्यक्ष दिव्यांनी बोरसे, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव जागृती मोगरे, खजिनदार चेतन उपाध्याय ,सदस्य अश्विनी पाटील,मुकेश फलके तसेच सहकार्य ऋषिकेश सोनवणे, राहूल परदेशी व सद्गुरु गोरक्षनाथ महाराज बहुउद्देशीय संस्था रानमळा आदींनी परिश्रम घेतले. स्पर्धेतील विजेते:-प्रथम क्रमांक सारांश धनंजय सोनार(डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल कॉलेज, धुळे),द्वितीय क्रमांक हर्षदा किरण शेलार(आयटीआय कॉलेज, धुळे),तृतीय क्रमांक प्रफुल्ल तोतराम माळी(आयटीआय कॉलेज, धुळे),उत्तेजनार्थ:-१)धर्मेश साहेबराव हिरे(विद्यावर्धिनी महाविद्यालय,धुळे),२)श्वेता चंद्रकांत जैन,(विद्यावर्धिनी महाविद्यालय,धुळे)३) योगेश महेश महाले(मा.ध.पालेशा वाणिज्य कॉलेज, धुळे)
0 Comments
Leave a Reply. |
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |