Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
धुळे : के.वाय.के.एम फाऊंडेशन, महाराष्ट्र तर्फे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अरुणावती नदी काठी वसलेल्या खर्दे बु. या गावातील शनी मंदिर परिसरात असणाऱ्या पाड्यावरील लहान मुलांची आरोग्य तपासणी आणि शैक्षणिक पाहणी करण्यासाठी दिनांक २८ रोजी के.वाय.के.एम चे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय यांनी दौरा केला. यावेळी तेथील मुलांना बिस्कीटे वाटप करण्यात आली, खेळ आणि जादूचे प्रयोग दाखवून मनोरंजन करण्यात आले. तसेच संस्थेचे शिरपूर तालुक्यातील पदाधिकारी यांची आढावा बैठक घेऊन येत्या काळात या वस्तीत काय सुधारणा करण्यात येतील यावर चर्चा झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, शिरपूर तालुकाध्यक्ष गणेश चौधरी, तालुका सचिव हर्षदा सैंदाणे, स्वयंसेवीका प्रियंका कोळी उपस्थित होते. Comments are closed.
|
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |