Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
"मोफत (Covaxin) करोना लसीकरण अभियान" मोहिमेअंतर्गत लसीकरण पूर्ण करणार..! धुळे: करोना महामारीला आळा घालण्यासाठी आणि तिसऱ्या लाटेपासून नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या वतीने धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव रोड परिसरात सर्व्हे करण्यात आला. दिनांक ३ ऑगस्ट रोजी डॉ.मिरजकर नगर, पंचवटी नगर आणि पश्चिम हुडको या परिसरात हा सर्व्हे झाला, त्यात २५० घरातील १३० नागरिकांचे लसीकरण बाकी असल्याचे निदर्शनास आले. तसेच दिनांक ०४ ऑगस्ट रोजी पवन नगर, चाळीसगाव रोड या परिसरात हा सर्व्हे करण्यात आला, येथे १५० घरातील १०६ नागरिक लसीकरण बाकी असल्याचे निदर्शनास आले. हा सर्व्हे स्वतः के.वाय.के.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय आणि संस्थापक सदस्य मुकेश फलके ह्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला आणि त्यात महत्वाची बाब म्हणजे या सर्व नागरिकांची प्रथम लस बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या सर्व्हेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रथम लस बाकी असणाऱ्या नागरिकांना के.वाय.के.एम फाऊंडेशन आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "मोफत (Covaxin) करोना लसीकरण अभियान" याअंतर्गत खान्देश कॅन्सर सेंटर हॉस्पिटल,धुळे या ठिकाणी दिनांक ५,६,७ ऑगस्ट रोजी लसीकरण करण्यात येणार आहे. आवाहन के.वाय.के.एम फाऊंडेशन आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्यातील नागरिकांचे झपाट्याने लसीकरण करण्यासाठी "मोफत (Covaxin) करोना लसीकरण अभियान' आयोजित करण्यात आले आहे. दिनांक ०५, ०६, ०७ ऑगस्ट रोजी खान्देश कॅन्सर सेंटर, सुरत बायपास रोड, नवीन सिव्हिल हॉस्पिटलजवळ, धुळे या ठिकाणी हे अभियान आयोजित करण्यात आले आहे. ज्या नागरिकांची प्रथम किंवा द्वितीय लस घेण्याची बाकी असेल त्यांनी लसीकरण करण्यासाठी आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक सोबत घेऊन लसीकरणाच्या ठिकाणी उपस्थित रहावे. आपली नोंदणी करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असून आपणास PPE किट देखील उपलब्ध करून दिली आहे. कृपया फक्त COVAXIN या लसीचा प्रथम आणि द्वितीय डोस उपलब्ध आहे याची नोंद घ्यावी. Comments are closed.
|
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |