Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
महात्मा गांधी जयंती व अहिंसा दिनानिमित्त KYKM फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण व अहिंसेची शपथ.15/10/2020 धुळे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने व अहिंसा दिनाचे औचित्य साधून तरून पिढीला बापूंच्या अहिंसेची शिकवण मिळावी या हेतूने KYKM फाऊंडेशन,धुळे यांनी लळीग किल्ल्याच्या पायथ्याशी वृक्षारोपण करून अहिंसेची शपथ घेतली.
KYKM फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक तरुण एकत्रितपणे सामाजिक हिताचे कार्य करत असतात. तरूणांना अहिंसेची शिकवण मिळावी व अहिंसेच्या मार्गाने पुढील पिढी घडली पाहिजे या उद्देशाने फौंडेशनच्या वतीने धुळे येथील लळींग किल्ल्याच्या पायथ्याशी वृक्षारोपण करून अहिंसेचा मार्ग स्वीकारण्याची शपथ घेतली. तसेच "महात्मा pledge" या ऑनलाईन शपथ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, शपथ घेतल्यानंतर प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येत आहे.(visit : Kykm.weebly.com) यावेळी KYKM फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, या पदाधिकारी वर्गासोबत स्वयंसेवक आकाश पाटोळे, अनिल चौधरी, प्रेम वाकळे, निलेश कुलकर्णी, प्रतीक घटी आदी. उपस्थित होते.
0 Comments
Leave a Reply. |
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |