Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
धुळे : करोना महामारीला आळा घालण्यासाठी आणि तिसऱ्या लाटेपासून नागरिकांना सुरक्षित करण्यासाठी के.वाय.के.एम फाऊंडेशन आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "मोफत (Covaxin) करोना लसीकरण अभियान" प्रथम टप्पा ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान यशस्वी संपन्न झाला. २८ जुलै रोजी प्रायोगिक तत्वावर या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
या अभियानासाठी के.वाय.के.एम फाऊंडेशनच्या वतीने धुळे जिल्ह्यातील चाळीसगाव रोड परिसरात सर्व्हे करण्यात आला. दिनांक ३ ऑगस्ट रोजी डॉ.मिरजकर नगर, पंचवटी नगर आणि पश्चिम हुडको या परिसरात हा सर्व्हे झाला, त्यात २५० घरातील १३० नागरिकांचे लसीकरण बाकी असल्याचे निदर्शनास आले. तसेच दिनांक ०४ ऑगस्ट रोजी पवन नगर, चाळीसगाव रोड या परिसरात हा सर्व्हे करण्यात आला, येथे १५० घरातील १०६ नागरिक लसीकरण बाकी असल्याचे निदर्शनास आले. हा सर्व्हे स्वतः के.वाय.के.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय आणि संस्थापक सदस्य मुकेश फलके ह्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला आणि त्यात महत्वाची बाब म्हणजे या सर्व नागरिकांची प्रथम लस बाकी असल्याचे स्पष्ट झाले. लसीकरण बाकी असलेल्या सर्व नागरिकांचे खान्देश कॅन्सर सेंटर हॉस्पिटल,धुळे या ठिकाणी दिनांक ५,६,७ ऑगस्ट रोजी लसीकरण करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील रानमळा, मोहाडी, वाडीभोकर रोड, मिल परिसर, कॉटन मार्केट, इत्यादी दुरवरील ठिकाणच्या लोकांनी लसीकरण पूर्ण करण्यासाठी स्वइच्छा दाखवली. या सर्वांना द्वितीय डोस देखील या उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच अभियानाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येईल.ज्यात प्रथम लस बाकी असलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात येईल. हे अभियान यशस्वी करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशनचे राज्य समन्वयक श्री.दिपक केकन आणि व्यवस्थापक श्री. शुभम लाखकर, के.वाय.के.एम फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, संस्थापक सदस्य मुकेश फलके आणि जागृती मोगरे यांनी परिश्रम घेतले. Comments are closed.
|
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |