Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
कोरोना काळात माता-पितांच्या हस्ते ऑनलाइन पारितोषिक वितरणाचा प्रथम प्रयोग यशस्वी
के.वाय.के.एम फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यातर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने "महाराष्ट्र शब्दरंग करंडक-२०२१" राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे ऑनलाईन माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. युवकांनी सामाजिक विषयावर भाष्य करून वक्ता म्हणून सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन २०१८ सालापासून करण्यात येत आहे. कोरोना महामारीच्या काळात २०२१ या वर्षासाठी दिनांक १४ मार्च ते २४ मार्च या कालावधीत ही स्पर्धा ऑनलाइन माध्यमातून राबविण्यात आली, यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सध्याच्या परिस्थितीला अनुसरून या वर्षीच्या विषयांची निवड करण्यात आली होती (त्यात करून जावे बरेच काही या दुनियेतुन जाताना, महिलांची लढाई - अनैतिकतेशी!, करोना : एक संकट की संधी, राजकारण आणि आजचा युवक, शेतकरी : एका काळचा राजा हे विषय होते). स्पर्धेचा निकाल २७ मार्च रोजी संस्थेच्या वेबसाईटवर घोषित करण्यात आला त्यानुसार प्रथम क्रमांक संघमित्रा गायकवाड (पुणे), द्वितीय क्रमांक निलेश माने (जळगाव) आणि तृतीय क्रमांक सौरभ पाटील (कोल्हापूर) यांनी पटकाविला, परंतु कोरोना महामारी मुळे सुरू असलेल्या टाळेबंदीच्या काळात बक्षीस वितरण समारंभ आयोजित होऊ शकला नाही, त्यामुळे संस्थेच्या वतीने पोस्टाद्वारे विजेत्यांना पारितोषिक आणि प्रमाणपत्र पाठविण्यात येऊन ऑनलाइन माध्यमातून पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला, आणि विजेत्यांना त्यांच्या माता-पित्यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले, तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. स्पर्धेच्या पारितोषिकासाठी स्मृतिचिन्ह युवक मित्र परिवाराचे अध्यक्ष श्री प्रवीण महाजन यांनी संस्थेला भेट केले. या स्पर्धेचे आयोजन के.वाय.के.एम फाऊंडेशनचे महाराष्ट्रातील सर्व विभागातील प्रत्येकी एक आयोजक मिळून करण्यात आले, त्यात आकाश कोल्हे (पुणे), प्राजक्ता माळी (उत्तर महाराष्ट्र), गायत्री साबळे (कोकण), दीपाली कांबळे (विदर्भ), प्रवीण आटोळे (मराठवाडा) यांचा सहभाग होता. तसेच पर्यवेक्षण तथा निरीक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहनिष वाडेकर, सचिव कल्पेश बोरसे, सहसचिव चेतन उपाध्याय, संस्थापक सदस्य जागृती मोगरे यांनी केले.
0 Comments
Leave a Reply. |
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |