Event
"We cannot drive people, we must direct their development."
- Woody Williams
- Woody Williams
के.वाय.के.एम.फाऊंडेशन तर्फे वटपौर्णिमेचे औचित्य साधून "वटपौर्णिमा-एक नवा संकल्प" हा लघुचित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या लघुपटातून वटपौर्णिमा सणानिमित्त झाडे लावा असा संदेश देण्यात आला.तसेच दि.२७ जून रोजी वटपौर्णिमेच्या दिवशी स्वामी विवेकानंद कॉलोनी, अभय कॉलेज जवळील मारोती मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या ठिकाणी ज्या महिलावडाची पुजा करण्यासाठी येतील त्यांनी प्रत्येकी एक वृक्ष लागवड करावी व त्याचे जतन करावे असा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात भव्य मोठ्या संख्येने महिला उपस्थिती होत्या व प्रत्येकाने स्वइच्छेने वृक्षारोपण केले.या कार्यक्रमासाठी विशेष सहभाग व सहकार्य परिसरातील रहिवासी ज्योतीताई चौधरी,अनिता फलके, मंगलाबाई पाटील, शितल चौधरी यांनी केले.सासरी पहिली वटपौर्णिमा असणाऱ्या प्रियंका वाघ यांनी,असा उपक्रम प्रथमच या संस्थेने राबविला आणि नक्कीच हा उपक्रम दुष्काळी परिस्थिती, व पृथ्वी रक्षण करण्यासाठी योग्य दिशा देईल असे सांगितले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे मार्गदर्शक धुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे मा.श्री.जितेंद्र सोनवणे साहेब, ट्रायबल अँड रूरल डेव्हलपमेंट फौंडेशनचे अध्यक्ष श्रीमती. रुक्मिणी ओझा,के.वाय.के.एम.फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.मोहनिष वाडेकर सर, उपाध्यक्ष श्रीमती. दिव्यांनीताई बोरसे, सचिव श्री.कल्पेश बोरसे,,खजिनदार श्री. चेतन उपाध्याय, संस्थेचे कमिटी सदस्य श्री. मुकेश फलके, श्रीमती. जागृती मोगरे, श्रीमती. आश्विनी पाटील, आदी उपस्थिती होते.
0 Comments
Leave a Reply. |
KYKM FOUNDATIONOfficial Event Blog 2021-22
March 2022
Categories |